अहमदनगर : खडका फाट्यावर दोन लाख रुपये जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे निवडणूक पथकाने आज दोन लाख रुपये जप्त केले आहे. ही रक्कम श्रीरामपूर कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

नेवासा विधानसभा मतदार संघाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने पाखरे यांच्या नेतृत्वाखाली खडका फाटा येथे रक्कम २ लाख रुपये जप्त केले आहेत. या कारवाईचेव्हिडिओग्राफी, पंचनामा केलेला असून, रक्कम पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर कोषागारात पाठविण्यात येईल. सकाळी 10 च्या सुमारास औरंगाबादकडून मुंबईकडे जाणाऱ्या ब्रेझा वाहनात (क्र. MH 20 EY 9399) ही रक्कम सापडली. पथकाने पंचनामा करून ती रक्कम हस्तगत केली आहे.

जप्त केलेली रक्कम श्रीरामपूर कोषागार कार्यालयात पाठविण्यात आली आहे. त्या रकमेबाबत आयकर विभागाला कळविण्यात येईल. आयकर विभागाच्या चौकशीनंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले

Visit : Policenama.com