Elon Musk-Nicole Shanahan-Sergey Brin | एलन मस्कसोबत गुगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीचे प्रेमसंबंध! घेतला घटस्फोट

नवी दिल्ली : Elon Musk-Nicole Shanahan-Sergey Brin | गुगलचे को-फाऊंडर सर्गे ब्रिन (Google Co Founder Sergey Brin) यांनी घटस्फोट घेतला आहे. यामुळे एलन मस्क आणि सर्गे ब्रिन यांची पत्नी यांच्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यानंतर मस्क आणि निकोल शानहान यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पत्नी निकोल शानहानाचे अब्जाधीश एलन मस्क यांच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे (Elon Musk-Nicole Shanahan-Sergey Brin). निकोल शानहान वकील आहेत. शानहान आणि मस्क यांच्या प्रेमसंबंधाची बातमी अमेरिकेतील वॉल स्ट्रिट जनरलने दिली होती (Google Co Founder Sergey Brin Divorced Wife).

कोर्टाची कागदपत्रे समोर आल्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळाली की, दोघांमधील घटस्फोटाचा अर्ज २६ मे रोजी देण्यात आला होता. परंतु, याबाबत मीडियामध्ये माहिती नसल्याने लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत होते. सर्गे ब्रिन आणि निकोल शानहान दोघांना चार वर्षांची मुलगी आहे. तिच्यासाठी दोघे कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यामुळे जोडपे आता अधिकृतरीत्या वेगळे झाले आहे. (Elon Musk-Nicole Shanahan-Sergey Brin)

२०१५ मध्ये दोघांमध्ये जवळीक वाढली होती. ब्रिन यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट त्याच वर्षी झाला होता. यानंतर २०१८ मध्ये दोघांनी विवाह केला होता.

एलन मस्क आणि निकोल शानहानचे स्पष्टीकरण

शानहान आणि मस्क घटस्फोटापूर्वी एक महिना आधी सोबत दिसले होते. याच कारणामुळे अफेयरची चर्चा सुरू झाली. मात्र, मस्क आणि शानहान दोघांनी ट्विटरवर या प्रकरणात स्पष्टीकरण दिलेले आहे. मस्क यांनी २५ मे २०२२ च्या स्पष्टीकरणात लिहिले होते की सर्गे आणि मी काल रात्री एका पार्टीमध्ये होतो, आम्ही केवळ मित्र आहोत.
आम्ही ३ वर्षात केवळ २ वेळा भेटलो आहोत, त्यावेळी सुद्धा आमच्या आजूबाजूला लोक होते.

निकोल शानहानने सुद्धा स्पष्टीकरण देताना म्हटले की, जाणूनबुजून अशी अफवा पसरवली जात आहे.
मस्क यांच्याशी माझी केवळ ओळख आहे. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कसल्याही प्रकारचे संबंध नाहीत.
दरम्यान, वॉट स्ट्रिट जनरलने आपल्या वृत्तावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे.

गुगलचे सहसंस्थापक ५० वर्षीय ब्रिन जगातील नवव्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.
तर शानहान (३४) कॅलिफॉर्नियामध्ये वकील आहेत आणि बाय-इको संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi Networth | पंतप्रधान मोदींची संपत्ती किती? जाणून घ्या