मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Elvish Yadav Snake Smuggling Case | शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानातील गणपतीच्या आरतीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत रेव्ह पार्ट्यांमध्ये (Rave Party) ड्रग्ज (Drugs) आणि परदेशी तरूणी पुरवणारा एल्विश यादव (Elvish Yadav Snake Smuggling Case) देवाची आरती करताना दिसत आहे. या फोटोवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर अरोप केले आहेत.
युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ (Bigg Boss OTT 2) चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल आहे. एल्विश रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करतो आणि तिथे येणाऱ्या लोकांना सापाचे विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. उत्तर प्रदेशमधल्या नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात इतर पाच जणांना अटक झाली असून एल्विशला अटक होण्याची शक्यता आहे. (Elvish Yadav Snake Smuggling Case)
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा एल्विशचा फोटो व्हायरल झाल्याने शिंदे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. कारण, यंदाच्या गणेशोत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर एल्विश मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेला. तिथे त्याने गणपतीची आरतीदेखील केली होती. त्याने मुख्यमंत्र्यांबरोबर फोटोही काढले होते. एकनाथ शिंदे आणि एल्विशचे फोटो शेअर करत विरोधक एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू लागले आहेत.
याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. नशेबाज तरुणांना महाराष्ट्रातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात मुख्यमंत्री हातभार लावत आहेत का?
वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवसारख्या नशाबाजांना वर्षा बंगल्यावर बोलवून त्याचे आदरातिथ्य केले होते. शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला होता. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, ड्रग्जची विक्री करणारा, सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, त्याचे सेवन करणे आणि ते विकणे असे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत.
तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एल्विश आणि एकनाथ शिंदेंचा
गणेशोत्सवातला फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्ज रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्जशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे?
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या
५ गारुड्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ कोब्रा नाग आणि सापाचे विष जप्त केले आहे.
या गारुड्यांनी सांगितले की ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे.
त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर एल्विश यादवने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
यात त्याने म्हटले आहे की, खरे तर मला गंभीर विषयांवर बोलायला आवडत नाही. परंतु,
माझ्याविरोधात पूर्णपणे खोट्या बातम्या पसरल्या आहेत. त्यामुळे मला बोलावे लागत आहे.
माझा त्या गोष्टींशी कसलाच संबंध नाही. तुम्ही लोक रोज माझे व्लॉग्स बघता.
मी रोज नवनव्या ठिकाणी असतो. विषारी सापांचे विष पुरवतो, असा माझ्यावर आरोप आहे.
आता हेच काम उरलंय माझ्या आयुष्यात.
सापांचे विष लोकांना विकू आणि त्याची नशा करू? असा सवाल एल्विशने केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Supreme Court | सर्वोच्च न्यायालय हे ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, हीच इच्छा : CJI चंद्रचूड