इंडिगो विमानाची गोव्यात इमर्जन्सी लँडिंग, मंत्री, अधिकार्‍यांसह 180 प्रवासी बचावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी रात्री उशीरा इंडिगो कंपनीच्या विमानाचे गोव्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान दिल्लीला जाताना तांत्रिक बिघाड झाला. या विमानात एक मंत्री, अधिकारी आणि 180 प्रवासी होते.

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग
सदर इंडिगो विमानात पर्यावरण मंत्री निलेश काब्राल, कृषी संचालक आणि अधिकारी प्रवास करत होते. याशिवाय 180 प्रवासीही होते. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. या विमानाची गोव्यातील डाबोलिम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे समजत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. एएनआयने याबाबत ट्विट करत ट्विटरवरून माहिती दिली आहे. नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.

‘समयसुचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली’
इंडिगो विमान दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले होते. यानंतर 15 मिनिटे होताच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समजले. या बिघाडामुळेच विमानाची इमर्जन्सी लँडिंग झाली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आले. समयसुचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली असे सांगण्यात येत आहे. इंडिगो एअरलाईन्सकडून अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Visit : policenama.com