खासदारांच्या कार्यालयाबाहेर निवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय लोककल्याण संस्थेने खासदार शरद बनसोडे यांच्या शिवस्मारक येथील संपर्क कार्यालयासमोर पेन्शनबाबत अर्धनग्न आंदोलन केले. ईपीएस ९५ पेन्शन मिळावी यासाठी अशा पध्दतीचे आंदोलन देशातील सर्वच खासदारांच्या घरासमोर किंवा कार्यालयासमोर करण्यात आले.

एस.टी. महामंडळ, डीसीसी बँक,विकास सोसायटी, साखर कारखाना, वीज कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या १५०० ते २००० रूपये पेन्शन मिळते. या विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरदारांप्रमाणे पेन्शन दिले जात नाही. यामुळे त्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव पेन्शन मिळावी यासाठी चंद्रहार आतकरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष गायकवाड, शिक्षक कर्मचारी संघटनेचे प्रशांत लंबे, राज्य सरकारी चतुर्थ मध्यवर्ती संघटनेचे देविदास शिंदे, शंकर जाधव, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना व इतर काही संघटनांचा सहभाग होता. दरम्यान, या आंदोलनाची सरकारने वेळीच दखल नाही घेतल्यास अखिल भारतीय स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष महादेव आतकरे व इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like