‘इंडियन कोस्ट गार्ड’मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही चांगली संधी आहे. सध्या अनेक ठिकाणी सरकारी नोकरीसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छूक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.

1) CVPP भरती 2019 
चिनाब वॅली प्रोजेक्ट्स लिमिटेड, NHPC Limited आणि JKSPDC लिमिटेड आणि PTC (India) लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने कंपनीने अप्रेंटिस अधिनियम, 1961 अंतर्गत इंजिनिअर ग्रॅजुएट्स आणि तांत्रिक ज्ञान असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. पात्र उमेदवार 28 ऑक्टोबर आधी अर्ज करु शकतात.

2) BPS RRB क्लर्क मेन्स अ‍ॅडमिट कार्ड 2019 डाउनलोड
IBPS RRB क्लर्क मेन्स ऑनलाइन परिक्षा 2019 ची सुरुवात 3 ऑक्टोबर 2019 पासून सुरु होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवरुन आपले परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे.

3) इंडियन कोस्ट गार्ड भरती 2019
इंडियन कोस्ट गार्डने डोमेस्टिक ब्रँचमध्ये नाविक पदासाठी भरती राबवली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवाराला 50 टक्के मार्कसह 10 वी पास असणे अत्यंत आवश्यक आहे.

4) IBPS PO Admit Card 2019 
IBPS ने 12 ऑक्टोबर 2019, 13 ऑक्टोबर 2019, 19 ऑक्टोबर 2019, 20 ऑक्टोबर 2019 ला या परिक्षेचे प्रवेशपत्र देण्यात येईल. उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवरुन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात.

5) IBPS RRB ऑफिसर मेन्स एडमिट कार्ड 2019 
या पदासाठीचे मुख्यपरिक्षेचे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आले आहेत. जे उमेदवार प्रीलिमसमध्ये पात्र ठरले आहे ते हे प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात.

6) DSSSB Admit Card 2019 डाउनलोड
DSSSB ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर स्टेनोग्राफर ग्रेड, पोस्ट कोड 21/18 च्या पदांसाठीचे प्रवेशपत्र जारी केले आहे. स्टेनोची परिक्षा 4 ऑक्टोबर 2019 ला आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय DSSSB GRADE IV (DASS) प्रवेश पत्र (पोस्ट कोड 2/17) ऑनलाइन सीबीटी परिक्षेसाठी 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आणि 4 ऑक्टोबरला SHIFT 1 जारी करण्यात येईल.

7) ICAR-National Research Centre for Banana Tiruchirapalli (NRCB) Job Notification
येथून यंग प्रोफेशनल I & II पदांसाठी अर्ज मागण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची 10 ऑक्टोबर 2019 मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल.

8) TN Govt Recruitment 2019
तमिळनाडू सरकारने विलेज हेल्थ नर्स पदांसाठी भरती प्रकिया राबवली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर 2019 पासून अर्ज करु शकतात.

Visit : Policenama.com 

 

You might also like