ENG vs PAK 2nd Test | इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान या ठिकाणी खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच संघ ठरला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच इंग्लड 2000 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला संघ बनला आहे.

आजच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे तर या संघाने आतापर्यंत 1057 कसोटी, 773 वनडे आणि 170 टी-20 सामने खेळले आहेत. इंग्लंडनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण 1995 सामने खेळले आहेत. या यादीमध्ये 1775 सामन्यांसह भारताचा तिसरा क्रमांक लागतो. तसेच पाकिस्तान 1608 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे संघ –
1. इंग्लंड – 2000*
2. ऑस्ट्रेलिया – 1995*
3. भारत – 1775
4. पाकिस्तान – 1608
5. वेस्ट इंडीज – 1595

Web Title :- ENG vs PAK 2nd Test | eng vs pak 2nd test england became the first team in the world to play 2000 international matches

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Love Jihad Bill | लवकरच अँटी लव्ह जिहाद कायदा? राज्य सरकारच्या हालचालींना वेग

Ranbir Kapoor | रणबीर कपूरने चित्रपटांमधील भूमिकांबद्दल घेतला मोठा निर्णय; म्हणाला…