इंग्लंडची ट्युनिशियावर २-१ ने मात

fifa world cup 2018


व्होल्गोग्रॅड : फुटबॉल विश्वचषकाचे सामने उत्तरोत्तर रंगत जात आहेत. आज जी गटातला ट्युनिशिया वि. इंग्लंड यांच्यातील सामना इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने २-१ असा सामना जिंकत ट्युनिशियाला मात दिली. इंग्लंडसाठी दोन्ही गोल कर्णधार हॅरी केन याने केले. तो या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांतच इंग्लंडने रोमहर्षक पद्धतीने हॅरी केनने पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली. नंतर सुमारे ४० मिनिटांनी ट्युनिशियाला पेनल्टी मिळाली आणि या संधीचं ट्युनिशियाने सोनं केलं. गोलचा पहिला प्रयत्न गोलकिपरने रोखला, मात्र त्याचवेळी गोलकिपरकडून आलेल्या बॉलला पुन्हा गोलपोस्टकडे सरकवत फर्जानी सॅसीने गोल केला. तेव्हा इंग्लंड आणि ट्युनिशियाने १-१ अशी बरोबरी साधली.

अटीतटीच्या या सामन्यातल्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये गोल करण्यात इंग्लंड यशस्वी झाला. अत्यंत आकर्षक पद्धतीने हेडरच्या सहाय्याने हॅरी केनने हा गोल केला. हॅरी केनने आतापर्यंत इंग्लंडसाठी १० सामन्यांमध्ये ८ गोल केले आहेत.