आता व्हॉट्स अॅपवर वाचता येणार डिलिट केलेलेही मेसेजेस…जाणून घ्या…कसे ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारतात व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेंजर अॅप आहे. लोकप्रिय म्हणजे भारतातील लोकांच्या दैनंदिन गरजेचं एक भाग व्हॉट्सअॅपला म्हणणे वावगं ठरणार नाही.व्हॉट्सअॅप वापरतांना चॅटिंग करतांना अनेकदा आपल्याकडून चुकीचा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविला जातो. अथवा एखाद्या अशा व्यक्तीला सेंड होतो ज्या व्यक्तीला उद्देशून आपल्याला तो पाठवायचा नसतो.अशा वेळी तो मेसेज डिलिट केला जातो. त्यामुळे तो इतरांना वाचता येत नाही. पण जर तुम्हाला डिलिट केलेला मेसेज देखील वाचायचा असेल तर फार काही कष्ट करण्याची गरज नाही.हे अगदी सोपे आहे पहा ते कसे !

डिलिट केलेले हे सर्व मेसेज अँड्राईड सिस्टिमच्या ‘नोटिफिकेशन रजिस्टर’मध्ये स्टोअर केले जातात. हे मेसेज जर तुम्हाला पाहायचे असतील, तर, तुम्हाला प्ले स्टोअरवरून ‘नोटिफिकेशन हिस्ट्री’ हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप तुमच्या मोबाइलला मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर या अॅपमध्ये व्हॉट्स अॅपवर आलेले मेसेज वाचण्यासाठी परवानगी द्यावी लागेल.आणि त्यामध्ये फोटो आणि मीडियासाठी अॅक्सेस द्यावे लागेल. यानंतर आलेल्या नोटिफिकेशन हिस्ट्री सेटिंगमधून व्हॉट्स अॅप नोटिफिकेशनसाठी परवानगी द्यावी लागेल. या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर या अॅपच्या मदतीने आपल्याला डिलिट केलेले मेसेज वाचता येऊ शकतात. या इन्स्टोल केलेल्या अॅप मधून आपण फक्त व्हॉट्सअॅप नाही, तर मोबाईलवर येणारे हँगआऊट आणि एस. एम. एस त्याचबरोबर  इतर नोटिफिकेशन्स पाहू शकता

पहा, डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी नेमक्या काय आहेत अटी
तुमच्या कडून डिलिट झालेले मेसेज तुम्ही ‘नोटिफिकेशन हिस्ट्री’ या अॅपच्या माध्यमातून पाहू शकता खरे. पण त्यासाठी देखील काही नियम आणि अटी आहेत. आपण जर मोबाइलला रिस्टार्ट केलात तर आपल्याला डिलिट केलेले मेसेजेस वाचता येणार नाहीत . १०० अक्षरांपर्यंत मेसेज रिकव्हर केला जाईल मात्र १०० पेक्षा जास्त अक्षरांचा मेसेज  रिकव्हर करता येणार नाही. ही ट्रिक फक्त अँड्रॉईड युजर्ससाठीच आहे.

या पद्धतींचा तुम्ही करू शकतात वापर 

१. आपल्या मोबाइलला मध्ये असणाऱ्या प्ले स्टोअरअॅप वरुन Notisave अॅप डाऊनलोड करुन घ्या
२. हे Notisave अॅप इन्स्टोल केल्यानंतर सर्व नोटिफिकेशन रेकॉर्ड करत असते.
३. Notisave अॅप नोटिफिकेशन अॅक्सेससाठी प्रथम परवानगी मागेल, यासाठी तुमच्या मोबाइलला हँडसेट मधील फोटो आणि मीडियाला अॅक्सेस द्यावा लागेल.
४. या मध्ये आपल्यासमोर अनेक अॅपच्या नोटिफिकेशनचे पर्याय उपलब्ध असतील . त्या सर्व पार्यायांमधून व्हॉटस्अॅप हा पर्याय निवडावा
५. यानंतर  Show On Status या पर्यायात व्हॉटसअॅप निवडा.
६. या निवडीनंतर सेटिंगमध्ये जाऊन अॅप्लिकेशन एड डेट सुरु करा. या सर्व प्रक्रियेनंतर तुम्हाला डिलिट केलेले सर्व मेसेज पाहता येतील.