‘ही’ मराठमोळी अभिनेत्री झाली ‘लेडी’ ब्रूस ली, खुद्द ‘बिग बीं’नी शेअर केला टीजर ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आजपर्यंत आपण अनेक अभिनेत्यांना सिनेमात मार्शल आर्ट करताना पाहिलं असेल. यात अक्षय कुमार, अजय देवगन, टायगर श्रॉफ, हृतिक रोशन, विद्युत जामवाल असे अनेक अभिनेते सांगता येतील. आता लवकरच महिलाप्रधान मार्शल आर्ट अ‍ॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम गोपाल वर्मांच्या या अ‍ॅक्शनपटाचं नाव ‘एन्टर द गर्ल ड्रॅगन’ असं आहे. खास बात अशी की, यात मराठमोळी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

खुद्द बिग बींनी शेअर केला सिनेमाचा टीजर
एन्टर द गर्ल ड्रॅगन या सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. मराठी अभिनेत्री पूजा भालेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाचा टीजर त्यांच्या फेसबुकवरून शेअर केला आहे. टीजर शेअर करताना त्यांनी म्हटलं की, “रामू नेहमीप्रमाणे माझ्या खूप खूप शुभेच्छा.”

काय आहे टीजरमध्ये ?
एन्टर द गर्ल ड्रॅगन या सिनेमाच्या टीजरच्या सुरुवातीलाच मार्शल आर्टीस्ट ब्रूस लीच्या ‘तुमच्यावर जर कोणी मात करू शकत असेल तर ते म्हणजे तुम्ही स्वत: आहात’ या वाक्यानं होताना दिसते. या सिनेमात पूजा भालेरावचा अलग अंदाज पहायला मिळत आहे. मार्शल आर्टवर आधारीत सिनेमा असल्यानं या सिनेमाच्या टीजरमध्ये अनेकदा ब्रूस लीचा उल्लेख आढळतो. एन्टर द ड्रॅगन्स हा ब्रूस लीचा शेवटचा सिनेमा होता. याच नावावर आधारीत या सिनेमाचं नाव आहे. पूजा हटके अंदाजात फाईट करताना दिसत आहे. टीजरमुळे चाहत्यांमध्ये सिनेमाला घेऊन आणखीच उत्सुकता वाढली आहे. सध्या हा टीजर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

Visit : Policenama.com 

 

Visit : Policenama.com