‘बोल्ड अ‍ॅन्ड हॉट’ झरिन खाननं केला धक्‍कादायक खुलासा, दिग्दर्शकानं केली होती ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावर मीटू प्रकरण झाल्यापासून बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी मोठे खुलासे केले. अभिनेत्री तनुश्री दत्ताने खुलासा केल्यापासून सुरू झालेल्या या प्रकरणात बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या अभिनेत्रींच्या यादीत आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. सलमान खानबरोबर करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री झरीन खानने नुकत्याच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. एका दिग्दर्शकाने तिला त्रास कसा दिला हे झरीनने सांगितले आहे.

View this post on Instagram

🐚 #VintageFeels #ZareenKhan

A post shared by Zareen Khan 🦄🌈✨👼🏻 (@zareenkhan) on

एका मुलाखतीमध्ये झरीन खानने सांगितले की, जेव्हा ती इंडस्ट्रीमध्ये नवीन होती तेव्हा दिग्दर्शकाने तिला किसिंग सीन रिहर्सल करण्यास सांगितले. ती म्हणाली की, त्यावेळी दिग्दर्शक मला म्हणाले तुझ्यामधील संकोच दूर करावा लागेल. त्यासाठी त्या दिग्दर्शकाने मला त्याच्याबरोबर किसिंग सीन करण्यास सांगितले. असे काही करण्यास स्पष्ट नकार दिला.

कास्टिंग काउचशी संबंधित आणखी एक किस्सा शेअर करताना झरीन खान म्हणाली की, इंडस्ट्रीतील एका व्यक्तीने तिला सांगितले होते की जर तिने त्याच्याशी मैत्री वाढवली तर तो भविष्यातील तिला प्रकल्पांमध्ये मदत करेल.

झरीन खानने सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट फ्लॉप असला तरी झरीन खानची बरीच चर्चा होती. लोक म्हणत होते की, झरीनचा चेहरा कतरिना कैफ सारखाच आहे. अलीकडेच झरीन तिच्या एका फोटोमुळे बरीच चर्चेत होती. झरीनने काही फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये तिचे स्ट्रेच मार्क दिसत होते. या फोटोवर लोकांनी तिला खूप ट्रोल केले. या ट्रोलिंगनंतर झरीनने एक पोस्ट लिहून ट्रोलर्सची बोलती बंद केली होती.

You might also like