EPF Balance Check | तुमचा PF किती जमा झाला आहे माहितीये का? जाणून घेण्यासाठी करा फॉलो काही स्टेप
पोलीसनामा ऑनलाइन – EPF Balance Check | नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोव्हिडंड फंड (Provident Fund) दिला जातो. नोकरी सुरु झाल्यापासून अनेकांच्या सॅलरीमधून एम्प्लॉई प्रोव्हिडंड फंड (Employee Provident Fund) वजा केला जात असला तरी त्याची एकूण किती रक्कम जमा झाली आहे याची माहिती कर्मचाऱ्यांना असते. ती कशी पाहावी हे त्या कर्मचाऱ्यांना माहिती देखील नव्हते. ही अडचण लक्षात घेत केंद्र सरकारतर्फे ‘उमंग ॲप्लिकेशन’ (Umang Application) तयार करण्यात आले. पीएफ खात्यामध्ये जमा झालेली राशी हातातील मोबाईलमध्ये सहजतेने पाहता यावे या उदात्त हेतूने ‘उमंग ॲप’ लॉन्च करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2017 साली हे ‘उमंग’ ॲप्लिकेशन लॉन्च केले. या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करुन आणि काही स्टेप फॉलो करुन पीएफची रक्कम (EPF Balance Check) जाणून घेता येणार आहे.
ईपीएफ अर्थात एम्प्लॉमेंट प्रोव्हिडंड फंडची रक्कम जाणू घेणे ही प्रक्रिया आता सहज व सोपी झाली आहे. उमंग ॲपच्या सहाय्याने पीएफ फंडची (PF Fund) एकूण राशी जाणून घेता येते. त्यासाठी काही स्टेप फॉलो केल्या तर रक्कम कळते. यासाठी ‘उमंग’ हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. त्यानंतर सुरुवातीला मोबाईल क्रमांक किंवा मेल आयडीने रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. उमंग ॲपमधील सुविधा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यानंतर ॲपमधील ईपीएफओ सर्विस (EPFO Service) या ऑप्शनवर क्लिक करावे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सर्विस (Service) आणि डिपार्टमेंट (Department) हे दोन पर्याय असतील. ईपीएफ जाणून घेण्यासाठी सर्विस हा पर्याय निवडावा.
उमंग ॲप्लिकेशनमध्ये ‘सर्विस’ हा पर्याय निवडल्यानंतर ‘व्ह्यू पासबुक’ (View Passbook)
या ऑप्शनवर जावे. यामधील ‘Employee-centric service’ हा ऑप्शन दिसेल
या पर्याय निवडल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा UAN नंबर टाकणे गरजेचे आहे. UAN नंबर म्हणजे ‘युनिव्हर्सल अकाउंट नंबर’ (Universal Account Number). हा 12-अंकी नंबर EPF मध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो. EPFO अर्थात ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने’द्वारे (Employees’ Provident Fund Organisation) UAN तयार करुन दिला जातो. हा क्रमांक टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. या ओटीपी टाकावा. त्यानंतर ओके या बटणावर क्लिक करावे. ही सर्व माहिती भरल्यानंतर अगदी काहीच मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या पीएफची एकूण जमा रक्कम (EPF Balance Check) पाहता येणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्या गुंडाला अटक
ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अॅन्टी करप्शनच्या जाळयात