EPFO | UAN लवकरात लवकर संलग्न करा Aadhaar सोबत, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या
नवी दिल्ली : EPFO | युनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजे UAN आधार नंबर (Aadhaar) सोबत संलग्न करण्याची अंतिम तारीख वाढवून आता 30 नोव्हेंबर केली गेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EMPLOYEES’ PROVIDENT FUND ORGANISATION- EPFO) युएएन आधार नंबर लिंक करण्यात लोकांना अडचण येऊ नये यासाठी एका अधिकार्याची नियुक्ती सुद्धा केली आहे. (EPFO)
तांत्रिक अडचण असेल तर येथे साधा संपर्क
EPFO ने म्हटले आहे की, त्यांनी UAN-Aadhaar लिंकिंगमध्ये मदतीसाठी उप-संचालक हर्ष कौशिक यांना नियुक्त केले आहे. पीएफ आयुक्त सनत कुमार यांच्यानुसार उप-संचालक हर्ष कौशिक यांच्याशी [email protected] वर संपर्क करून मदत घेता येऊ शकते. ते लिंकिंगसंबंधी तक्रारी सोडवण्यासाठी मदत करतील. जर एखाद्या कर्मचार्याला तांत्रिक अडचण येत असेल तर या अॅड्रेसवर ताबतोब संपर्क करावा.
PF चे पैसे जमा होणार नाहीत
Aadhaar आणि UAN लिंकिंग जर 1 डिसेंबरपूर्वी केले नाही तर ईपीएफओ मेंबर्सचे मोठे नुकसान होऊ शकते. जर एखाद्या कर्मचार्याचे पीएफ अकाऊंट आधारसोबत लिंक केले नसेल तर त्याचे पीएफचे पैसे जमा होणार नाहीत आणि कर्मचारी आपल्या पीएफ खात्यातून (PF Account) पैसे काढू शकणार नाहीत.
इन्श्युरन्ससाठी सुद्धा आहे आवश्यक
आपले पीएफ खाते अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी ते आधारसोबत लिंक असणे आवश्यक असते. पीएफ खात्यावर मिळणार्या इन्श्युरन्स कव्हरसाठी Aadhaar-UAN आपसात लिंक असणे आवश्यक आहे.
कर्मचारी विमा कव्हरच्या बाहेर जाईल
कारण तुमचे खाते आधारसोबत लिंक नसल्यास कर्मचार्याचे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स (EDLI) सुद्धा जमा होऊ शकणार नाही. यामुळे कर्मचारी विमा कव्हरच्या बाहेर जाईल. (EPFO)
UMANG App द्वारे करा लिंक
ईपीएफओने म्हटले आहे की, ईपीएफओ सदस्य उमंग मोबाईल अॅपच्या माध्यमातून यूएएन-आधार लिंकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतात. उमंग अॅपच्या माध्यमातून आधार आणि यूएएन खाते अशाप्रकारे लिंक करता येऊ शकते –
– उमंग अॅप Google Play Store किंवा Apple iOS च्या माध्यमातून डाऊनलोड करा.
– ईपीएफओ लिंकवर क्लिक करा.
– ‘ईकेवायसी सर्व्हिसेस’वर टॅप करा.
– ‘आधार सीडिंग’ पर्याय निवडा आणि आपला यूएएन तयार ठेवा.
– यूएएन नंबर नोंदवा आणि यानंतर ओटीपी फोन नंबरवर पाठवला जाईल.
– सर्व माहिती नोंदवा.
– तुमचे आधार तुमच्या यूएएन नंबरसोबत जोडले जाईल.
Web Title :- EPFO | link your aadhar card with epf account online or offline uan aadhaar link
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Cigarette | एक सिगारेट कमी करते तुमच्या आयुष्यातील 6 मिनिटे, यामध्ये आहेत ‘ही’ चार हजार हानिकारक तत्व
- Pune Crime | काल्याच्या जेवणातून 45 जणांना विषबाधा, काही जणांची प्रकृती चिंताजनक; पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना
- Heart Attack In Winter | हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ पध्दतीनं घ्या हृदयाची काळजी; जाणून घ्या