नोकरदारांना बसू शकतो झटका ! PF वरील व्याजदर होऊ शकतं ‘एवढं’ कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्यांना मोठा झटका बसू शकतो. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रॉविडेंट फंड (पीएफ) वरील व्याज दरात कपात करण्याच्या विचारात आहे. EPFO आर्थिक वर्ष 2020 साठी पीएफ ठेव वर व्याज दरात 15 बेसिस पॉईंट्स म्हणजे 0.15 टक्क्यांनी कपात करुन व्याजदर 8.50 टक्के करु शकते.

आर्थिक वर्ष 2019 मध्ये व्याज दर 8.65 टक्के होते. नोकरदारांसाठी पीएफ भविष्याच्या सुरक्षेसाठी मोठे माध्यम आहे आणि व्याज दर कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम नोकरदारांवर होतो. 5 मार्चला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रॅस्टीजच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यासाठी चर्चा केली जाईल.

या दोन कंपन्यामध्ये ईपीएफओचे 4,500 कोटी रुपये अडकले –
EPFO ने नॉन बँकिंग फायनांशिअल इंस्टीट्यूशन्समध्ये जवळपास 4,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. यात दीवान हाऊसिंग फायनान्स (DHFL) आणि इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनेंशियल सर्विसेज (IL&FS) सहभागी आहे. या दोन संस्थेत लावण्यात आलेले पैसे परत तात्काळ मिळवणे अवघड आहे कारण या दोन्ही कंपन्या बँकरप्सी रिजॉल्यूशन प्रॉसेसमधून जात आहे.

EPFO ने एकूण 18 लाख कोटी रुपयांची केली गुंतवणूक –
ईपीएफओने 18 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. यातील 85 टक्के डेट मार्केटमध्ये आणि 15 टक्के ETFs च्या माध्यमातून इक्विटीजमध्ये केली आहे. मार्च 2019 च्या अखेरीस इक्विटीजमध्ये ईपीएफओची एकूण गुंतवणूक 74,324 कोटी रुपये होती आणि त्यांनी 14.74 टक्के परतावा मिळवला होता.