ऑगस्टमध्ये उघडण्यात आली 10 लाख नवीन EPF अकाऊंट, जुलैच्या तुलनेत 2.5 लाख जास्त

नवी दिल्ली : रिटायरमेंट फंड संस्था ईपीएफओमध्ये ऑगस्टच्या दरम्यान सुमारे 10.05 लाख नवे अर्ज करण्यात आले, तर जुलै महिन्याच्या 7.48 लाखांच्या आकड्यापेक्षा सुमारे अडीच लाख जास्त आहे. ताज्या पेरोल डाटाचे हे आकडे कोरोना व्हायरस महामारीदरम्यान औपचारिक सेक्टरमध्ये रोजगाराचा एक दृष्टीकोन सादर करत आहेत. या वर्षी प्रत्येक महिन्यात सरासरी सात लाख कर्मचार्‍यांची ईपीएफओमध्ये नवीन नोंदणी झाली आहे.

ईपीएफओकडून मागील महिन्यात जारी करण्यात आलेल्या पेरोल डाटामध्ये जुलै महिन्यांची नोंदणी 8.45 लाख दाखवण्यात आली होती, परंतु नंतर ती दुरूस्त करून घटवून 7.48 लाख करण्यात आली होती. मे मध्ये जारी पेरोल डाटाच्या हिशेबाने या वर्षी मे मध्ये 10.21 लाख नव्या अर्जांच्या तुलनेत मार्चमध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (ईपीएफओ) नवीन अर्ज कोरोना व्हायरसमुळे घटून 5.72 लाखच राहिले होते.

मंगळवारी जारी ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये नव्या अर्जांचा आकडा निगेटिव्ह (-1,04,608) मध्ये होता, तर सप्टेंबरमध्ये जारी आकड्यांमध्ये हा मायनस (-) 61,807 म्हणजे या दरम्यान ईपीएफमध्ये सहभागी होणे किंवा पुन्हा सहभागी होणार्‍यांपेक्षा खाते बंद करणार्‍यांची संख्या जास्त होती. जुलैमध्ये जारी डाटामध्ये एप्रिलमध्ये नवीन नोंदणी एक लाख दाखवण्यात आली होती, तर ऑगस्टमध्ये ती दुरूस्त करून अवघी 20,164 राहिली.

यानंतर सप्टेंबरमध्ये आलेल्या आकड्यांमध्ये एप्रिलची नोंदणी आणखी घटून मायनस (-)61,807 करण्यात आला. एप्रिलशिवाय मेसाठी सुद्धा मागील महिन्यात जारी डाटामध्ये अंदाजे 40,551 नवीन नोंदणी घटवून या महिन्यात आलेल्या रिपोर्टमध्ये मायनस (-) 35,336 करण्यात आली आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी जास्त खाती
मागील आर्थिक वर्षाच्या 61.12 लाख नव्या ईपीएफ खात्यांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्ष 2019-20 च्या दरमयान नवी सबस्क्रायबर्सची संख्या 78.58 लाख राहिली आहे. ईपीएफओने एप्रिल -2018 पासून प्रत्येक महिन्याला सहभागी होणार्‍या नवीन खात्यांचा पेरोल डाटा जारी करणे सुरू केले होते. तो सुरू करताना सप्टेंबर-2017 पासून डाटा जारी केला गेला होता. सप्टेंबर-2017 ते ऑगस्ट-2020 पर्यंतच्या डाटाच्या हिशेबाने नवीन ईपीएफ खाते उघडणार्‍यांची संख्या 1.75 कोटीपेक्षा जास्त आहे. ईपीएफओचे सध्या 6 कोटीपेक्षा जास्त सक्रिय खातेधारक आहेत.