रेल्वेचे तिकिट ‘कन्फर्म’ नसतानाही करु शकता ‘प्रवास’ ; जाणून घ्या कसा ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्याला कायमच रेल्वेने प्रवास करावा लागतो. जर कधी आपल्याला लांब पल्याचा प्रवास करावा लागला आणि तिकीट कन्फर्म नसेल तर आपल्याला बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळी आपल्याला ऐनवेळी निर्णय घ्यावा लागतो की आपल्याला प्रवास करायचा आहे की नाही. परंतू आता त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करण्याची गरज पडणार नाही. जर तुमचे तिकीट कन्फर्म झाले नसेल तरी आता तु्म्ही IRCTC च्या ‘विकल्प’ या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या अंतर्गत तुम्हाला दुसऱ्या, पण त्याच मार्गाने प्रवास करणाऱ्या रेल्वेमधील सीट उपल्बध करुन दिले जाते. कोणत्याही वर्गाने (class) प्रवास करणारा प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. नक्की काय आहे ही योजना चला पाहुयात.

काय आहे रेल्वेची ‘विकल्प’ योजना-

वेटिंगवर तिकिट असलेल्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने ही विकल्प योजना आणली आहे. या अंतर्गत प्रवाशांना रेल्वेमध्ये सीट न मिळाल्यास प्रवाशांना पर्याय म्हणून दुसरी सीट मिळावी यासाठी ही विकल्प योजना आहे. हा पर्याय ना की फक्त ऑनलाइन बुकिंग वरच उपल्बध आहे तर खिडकी तिकिटावर देखील उपल्बध करण्यात आला आहे.

नियम आणि अटी –

या विकल्प योजनेचा लाभ रेल्वे आणि सीटच्या उपल्बधतेवर आधारित आहे. यातील नियमानुसार आपल्याला कोणत्या स्टेशनवरुन प्रवास करायचा आहे आणि आपल्याला कुठपर्यंत सीट मिळेल यात देखील बदल होऊ शकतात.

कोणतेही जास्त शुल्क लागणार नाही –

या विकल्प योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे वाढीव शुल्क प्रवाशांकडून आकारण्यात येणार नाही. या योजनेनुसार प्रवाशाला जर कोणत्याही इतर रेल्वेत सीट मिळाली तर प्रवासी त्या रेल्वेने प्रवास करु शकत नाही ज्या रेल्वेचे तिकिट त्याने आधी काढले होते.

रिफंड क्लेम –

प्रवाशांसाठी हे गरजेचे आहे की ‘ज्या’ पर्यायी रेल्वेचे तिकीट त्यांनी घेतले आहे त्याचा चार्ट बनल्यानंतर आपला पीएनआर क्रमांक पुन्हा एकदा सीट आणि कोचकडून तपासून घेणे. जर दुसऱ्या रेल्वेमध्ये सीट मिळून देखील प्रवाशांनी त्या रेल्वेने प्रवास केला नाही तर प्रवासी रिफंडसाठी क्लेम करु शकतात.