‘लॉकडाऊन’ध्ये शुटींग बंद असली तरीही ‘हे’ स्टार्स करताहेत ‘Work from Home’!


पोलिसनामा ऑनलाइन –
जशा प्रकारे अनेक कंपन्या वर्क फ्रॉम करत आहेत त्याचप्रमाणे बॉलिवूड सेलेब्सही वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहेत. हे स्टार्स काही ना तयार व्हिडीओ करून चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. याच स्टार्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) अमिताभ बच्चन- घरातूनच बिग बींनी कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीजनचं काम सुरू केलं आहे. त्यांनी घरातूनच प्रोमो शुट केला आहे जो टीव्हीवरही आला आहे. लवकरच ते केबीसीसाठी इतर शुट करू शकतात.

2) सलमान खान- सलमान खाननंही लॉकडाऊनमध्ये दोन गाणी रिलीज केली आहेत. एक गाणं कोरोनावरच होतं जे त्यानं लिहिलं आणि गायलं होतं आणि रिलीज केलं होतं. यानंतर जॅकलीन फर्नांडिससोबत आणखी एक गाणं त्यानं रिलीज केलं आहे.

3) वरुण धवन- वरुणनं अद्याप अनेक व्हिडीओ शुट करून शेअर केले आहेत. त्यानं एका जाहिरातीसाठीही घरातूनच शुट केलं आहे असंही समजत आहे.

याशिवाय इतर अनेक स्टार्स असे आहेत जे त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स घरूनच काम करत आहेत. याशिवाय या कलाकारांनी जागरूकता निर्माण करण्यासाठीही अनेक गाणी तयार केली आहेत.