तरुणीवर बंदूक रोखणाऱ्या खासदार पुत्राचे अखेर आत्मसमर्पण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तरुणीवर बंदुक रोखणाऱ्या आशिष पांडेने पटियाला हाऊस कोर्टात आत्मसमर्पण केले आहे. मात्र आशिष पांडेने जामिनासाठी याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे सध्या आशिषला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आशिष पांडे हा बहुजन समाज पक्षाचे माजी खासदर राकेश पांडे यांचा मुलगा आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09b91c3e-d2c0-11e8-912a-95a8cd3bc2d6′]
फरार झालेला असताना आशिष पांडेने एक व्हिडीओ जारी करुन, फसवलं जात असल्याचा दावा केला होता. तसेच, मी दहशतवादी असल्यासारखं मला सादर केले जात असून, माझी मीडिया ट्रायल केली जात आहे, असेही आशिष पांडेने म्हटले होते. आशिष पांडेला १४ ऑक्टोबरपासून दिल्ली पोलिस शोधत होते. दिल्ली पोलिसांनी लखनऊसह अनेक ठिकाणी आशिषला शोधला. मात्र त्याला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. त्यानंतर अखेर आज आशिष पांडेने आत्मसर्पण केले.
[amazon_link asins=’B071JWBFDT,B06XFLY878′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’143102de-d2c0-11e8-b5be-55a60468a23f’]

“माझी चूक होती, हे मी मान्य करतो. मात्र या घटनेला एकांगीपणे दाखवलं गेलं. पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी. सीसीटीव्ही दाखवले जावेत, जणेकरुन लक्षात येईल की, लेडीज टॉयलेटमध्ये कोण घुसला होता आणि कुणी धमकी दिली होती. मी बंदूक रोखली नव्हती. तरुणीने अश्लिल इशारे केले. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.”, असेही आशिष पांडेने म्हटले आहे.

[amazon_link asins=’B075T1YTR9,B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e76193e-d2c0-11e8-b254-47dacc059c28′]

“बंदूक मी हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो. बंदूक कारमध्येच होती. तरुणीने शिवी दिल्यानंतर बंदूक आणली, मात्र ती बंदूक तिच्यावर रोखून धरली नाही. पूर्णवेळ बंदुक मी मागील बाजूस ठेवली होती. माझ्या सुरक्षेसाठी बंदूक ठेवू शकत नाही का? माझा परवाना वैध आहे.”, असेही आशिष पांडे याने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले.

आशिष पांडे लेडीज टॉयलेटमध्य घुसला होता. तेव्हा तरुणीने विरोध केला, मात्र त्याने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली, असा आरोप आशिष पांडेवर आहे. शिवाय, यावेळी त्याने स्वत:कडील बंदूकही तरुणीवर रोखली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आशिष पांडे आणि त्याचे मित्र एका व्यक्तीला शिव्या देत असल्याचे दिसत आहे.