माजी केंद्रीय मंत्र्याचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘दावा 30 कोटींचा, पण खरं लसीकरण 4 कोटीच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यातच देशात 1 मे पासून तिस-या टप्यात 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीमेच्या वेगावर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, असे रमेश यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारने 21 जानेवारी 201 रोजी दावा केला होता की, जुलै अखेरपर्यंत 30 कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्यात येील. परंतु सत्य हे आहे की 22 मे 2021 पर्यंत केवळ 4.1 कोटी भारतीयांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याचे सांगत रमेश यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने 21 मे रोजी दावा केला होता की 2021 च्या अखेरपर्यंत भारतात सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जाईल. परंतू सत्य हे आहे की 21 मे रोजी एका दिवसात केवळ 14 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आम्हाला लस हवी आहे मगरीचे अश्रू नकोत, असेही रमेश यांनी म्हटले आहे.