निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! आता तुमचे वोटर कार्ड सुद्धा होईल डिजिटल, आधार कार्डसारखे करू शकता डाऊनलोड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोग लवकरच वोटर कार्ड डिजिटल फॉर्मेटमध्ये बदलण्याच्या योजनेवर काम करत आहे. सोप्या शब्दत सांगायचे तर मतदार आता आधार कार्डसारखे मतदार ओळखपत्र सुद्धा डिजिटल फॉर्मेटमध्ये आपल्याकडे ठेवू शकतात. मात्र, सध्याचे फिजिकल कार्ड सुद्धा मतदाराकडे असेल. सध्या मतदार ओळखपत्र धारकांना वोटर हेल्पलाईन अ‍ॅपद्वारे केवायसी केल्यानंतरच ही सुविधा मिळेल. निवडणूक आयोगाचा उद्देश मतदारांना मतदार फोटो ओळखपत्राची सुविधा सहजपणे उपलब्ध करून द्यायची आहे.

सर्व्हिस वोटर्ससाठी लाभदायक ठरणार नवी व्यवस्था
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नवीन मतदार आपले मतदार ओळखपत्र इंटरनेटवरून डाऊनलोड करू शकतात. इतकेच नव्हे, या डिजिटल कार्डद्वारे ते आपल्या मताधिकाराचा वापर सुद्धा करू शकतात. याशिवाय मतदार ओळखपत्र मिळण्यात उशीर होण्याच्या समस्येपासून सुद्धा दिलासा मिळेल. तर, निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये नोंदलेल्या सर्व्हिस वोटर्ससाठी सुद्धा हे खुप लाभदायक ठरेल. सर्व्हिस वोटर्स या निर्णयानंतर ईपीआयसी डिजिटल फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करू शकतात.

ओव्हरसीज वोटर्सला सुद्धा मिळणार डिजिटल कार्डची सुविधा
आयोगाच्या निर्णयानंतर रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत ओव्हरसीज मतदार सुद्धा डिजिटल वोटर कार्ड सुविधेचा लाभ घेऊ शकतील. मात्र, सध्या परदेशात राहणार्‍या भारतीयांना मतदानाची सुविधा देण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाने याबाबत एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. ओव्हरसीज भारतीय वोटर कार्डसुद्धा जारी करण्यात येत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ओव्हरसीज वोटर्ससुद्धा आपले ईपीआयसी म्हणजे डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करू शकतील. जर एखाद्या मतदाराने दुसरीकडे शिफ्ट केले असेल आणि त्यास नवीन ठिकाणी मतदार बनणायचे असेल तर आवश्यक प्रक्रियेच पालन करून या सुविधेद्वारे नवीन वोटर कार्ड डाऊनलोड करू शकतात.

कार्डातील क्यूआर कोडद्वारे करू शकतील मतदान
एखाद्या मतदाराचे फिजिकल कार्ड हरवले असेल आणि नवीन कार्डसाठी अर्ज केला आहे आणि त्यास स्वीकृती मिळाली आहे तर तो डिजिटल कार्ड डाऊनलोड करू शकतो. डिजिटल वोटर कार्डमध्ये दोन क्यूआर कोड असतील. याच कोडच्या माहितीच्या आधारावर इंटरनेटवरून डाऊनलोड करण्यात आलेल्या मतदार ओळखपत्राद्वारे मतदार मतदान करू शकेल.

यामध्ये एका क्यूआर कोडमध्ये मतदाराचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग यासंबंधीच्या माहितीसह मतदाराचा फोटो असेल. तर, दूसर्‍या क्यूआर कोडमध्ये मतदाराचा पत्ता, मतदार यादीची क्रमसंख्या व इतर माहिती असेल. डिजिटल वोटर कार्डबाबत निवडणूक आयोगाची तयार पूर्ण झाली आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पुढील वर्षी होणार्‍या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सुविधा मतदारांना उपलब्ध होईल.