तळेगावात पकडले लाखोंचे विदेशी मद्य

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

तळेगाव चाकण रस्त्यावर एका स्कॉर्पिओ गाडीतून बेकायदेशीरपणे वाहतूक होणाऱ्या विदेशी मद्याच्या बाटल्या तळेगाव पोलिसांनी पकडल्या. सुमारे साडे सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. तर दोघांना अटक करण्यात आली आहे.

राहुल प्रमोद शर्मा (२५, रा.कुसगाव, मावळ) आणि बालमुकुंद कमलेश चौरसिया (२१, रा.मध्यप्रदेश) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण तळेगाव रस्त्यावर एका स्कॉप्रिओ मोटारीतून विदेशी मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीवायएसपी जी.एस. माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोस गिरीगोसावी, विठ्ठल वेडेकर, प्रशांत वाबळे, नामदास आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून गाडी ताब्यात घेतली.

[amazon_link asins=’B0725RBY9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be638ffc-898d-11e8-9cc1-916a0965d59d’]

गाडी तपासली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. यामध्ये बियर व इतर मद्य आढळून आले. अडीच लाख रुपये किंमतीचे मद्य आणि एक स्कॉप्रिओ गाडी जप्त केली आहे.