खुशखबर ! पुन्हा एकदा कमी होऊ शकतो तुमचा EMI, ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत RBI, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या दरात कपात करु शकते. असे झाले तर रेपो दरात (Repo Rate) ही लागोपाठ 5 वी कपात असेल. सरकार येणाऱ्या सणांच्या काळात आर्थिक व्यवहारांना प्रोस्ताहन देण्यासाठी कॉर्पोरेट कराच्या दरात कपात आणि कर्जाला प्रोस्ताहन देण्यासाठी पावले उचलत आहेत. यानंतर केंद्रीय बँका देखील आपल्या रेपो दरात आणखी कपात करु शकतात. त्यामुळे जे लोक बँकेतून गृह कर्ज आणि इतर कर्ज घेतील त्यांना कमी ईएमआय द्यावा लागेल.

मागील बैठकीत 0.35 टक्क्यांनी कमी केले होते व्याजदर
RBI चे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या अध्यक्षतेच्या बैठकीत मौद्रिक नीति समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर 4 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी चालू वित्तीय वर्षाच्या चौथ्या द्विमासिक मौद्रिक समीक्षेत घोषणा करेल. जानेवारी पासून केंद्रीय बँकांनी चार वेळा रेपोदरात 1.10 टक्क्यांनी कपात केली, या आधी ऑगस्टमध्ये झालेल्या मागील बैठकीत RBI ने रेपो दरात 0.35 टक्क्यांनी कपात करुन व्याजदर 5.40 टक्के केले आहे.

RBI ने आदेश दिले आहेत की बँकांचे व्याजदर रेपो रेटशी जोडावे. तज्ज्ञांच्या मते सरकारचे हात बांधलेले आहेत आणि आता पुढील काम केंद्रीय बँकांना करायचे आहे, त्यामुळे व्याज दरात पुन्हा एकदा कपात होणार आहे.

सीबीआयईचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमान मॅगजीन यांनी सांगितले की मागील काही आठवड्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल करण्यासाठी काही उपाय केले आहे. मुख्य आव्हान आहे ते म्हणजे मागणी वाढवणे. ते म्हणाले की आम्हाला आशा आहे की पुढील वर्षात RBI रेपो दरात 0.25 टक्क्यांची आणखी कपात करु शकतात त्यामुळे 5.15 टक्के व्याज होऊ शकतो.

किती होऊ शकते रेपो रेटमध्ये कपात
आयटीएफसीचे एएमसीचे प्रमुख सुयश चौधरी यांनी सांगितले की जागतिक आणि अंतर्गत परिस्थिती कमकुवत आहे, परंतू आम्हाला आशा आहे की रेपो दर 5 ते 5.25 टक्क्यांच्या दरम्यान राहिलं. आर्थिक व्यवहार सुस्त आहे, त्यामुळे केंद्रीय बँकांच्या दरात आणखी कपातीची शक्यता आहे.

Visit : policenama.com