धक्कादायक : ब्लड बँकेतून घेतलेले रक्त निघाले एक्स्पायर झालेले 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  ब्लड बँकेतुन ब्लड घेऊन  स्वतः हातानेच मरण ओढून घेतल्या सारखे झाले आहे. मंगळवार पेठेतील ब्लड बँकेने एका रुग्णास चक्क एक्स्पायर झालेले ब्लड दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  बारामती मधील योगेश लासुरे यांची पत्नी दिपाली लासुरे यांना स्तनांचा कँसर आहे, यामुळे ते उपचारासाठी पुण्यात  आले, यादरम्यान तपास केला असता डॉक्टरांनी  त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्त देण्याचा सल्ला दिला. त्यावेळी योगेश लासुरे यांनी मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेशी संपर्क साधला, तिथे जाऊन ब्लड चे पैसे मोजून त्यांनी रक्ताची पिशवी घेतली. ती घेताच ते तात्काळ रुग्णालयात पोहंचले, मात्र ती रक्ताची पिशवी पहाताच डॉक्टर भडकले, रक्ताच्या पिशवीवर चक्क एक्स्पायर झालेली तारिक होती.

#MeToo : मुकेश छाबडा यांचे दिग्दर्शक होण्याचे स्वप्न भंगले, फॉक्स स्टारकडून सर्व करार रद्द

१० ऑक्टोबर २०१८ ला रक्ताची तारिक संपली होती आणि ती आज १९ ऑक्टोबर २०१८ ला देण्यात आली.  त्यामुळे डॉक्टरांनी हे रक्त देण्यास नकार दिला.

त्यानंतर योगेश लासुरे यांनी पुन्हा ओम ब्लड बँकेशी संपर्क साधला, त्यावेळी चुकीने या रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याऐवजी या महिन्यातील १० तारीख एक्स्पायरी डेट म्हणून टाकण्यात आल्याचे  सांगण्यात आले.  त्यानंतर योगेश लासुरे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे याची तक्रार केली. मात्र या विभागाने तक्रार दाखल करुनही अद्याप  कोणतीही  कारवाई करण्यात आली नाही. तर ओम ब्लड बँकेकडून क्लेरिकल मिस्टेकमुळे हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत आहे.