स्फोटक प्रकरण : सनातन आणि शिवप्रतिष्ठानशी संबंधीत दोन कार्यकर्त्यांना एटीएसकडून अटक

मुंबई : वृत्तसंस्था

नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथून सनातन संस्थेशी संबंधीत असलेल्या साधक वैभव राऊतच्या मुसक्या आवळल्यानंतर आणखी दोन जणांना एटीएसने अटक केली आहे. या दोघांपैकी एकाला नालासोपारा तर दुसऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद कळस्कर आणि सुधनवा गोंधळेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यामध्ये सुधनवा गोंधळेकर याचा शिवप्रतिष्ठानशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21738769-9cab-11e8-b153-eb668cbe884d’]

आज पहाटे वैभव राऊतला अटक करून त्याच्याकडून आठ देशी बॉम्ब, गन पावडर आणि डिटोनेटरचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला.  या अटकेनंतर एटीएसने त्याची कसून चौकशी केल्यानंतर शरद काळसकर आणि सुधनवा गोंधळकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत महाराष्ट्राला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. अटक करणाऱ्या आरोपींकडून महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट होता. महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, आणि नालासोपाऱ्यात घातपात करण्याचा कट होता.

एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊतचा सनातनशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सुधनवा गोंधळेकर याचा संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधनवा गोंधळेकर या तिन्ही आरोपींना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26f0b5a5-9cab-11e8-8837-91810541882a’]

दोघांना अटक केल्यानंतर राऊत राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात येणार आहेत. दोन ते तीन महिन्यापूर्वीपासूनचे हे फुटेज तपासण्यात येणार आहेत. त्यातून राऊतच्या घरी कोणाचं येणं-जाणं होतं. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, याची माहिती उजेडात येणार असल्याचं एटीएस सूत्रांनी सांगितलं. या दोघांव्यतिरिक्त राऊतच्या संपर्कात आणखी कोणी होते का? याचाही तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.