पुण्यातील एका चॅनेलच्या ४ पत्रकारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन

खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यातील एका युट्युब चॅनेलच्या चार तोतया पत्रकारांविरुद्ध परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाचा अपंग निधी का खर्च केला नाही? सरपंच महिला गावात न राहता परभणी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी का राहतात? असे प्रश्न विचारून ही बातमी चॅनेलवर न दाखविण्यासाठी १० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या घटनेने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. हा प्रकार ताडकळस पासून जवळच असलेल्या माखणी गावात मंगळवारी (दि.२५) घडला.
[amazon_link asins=’B077B3MXKW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29628847-c33b-11e8-b3a0-29fbcd71548a’]

मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान हे तोतया पत्रकार एका महागड्या चारचाकी गाडीतून माखणी येथे आले. सुटा-बुटातील एक तरुण आणि त्याच्या सोबत तीन सुशिक्षीत तरुणांनी गावातील काही व्यक्तींना सरपंच कोण आहेत अशी विचारणा करुन त्यांचा मोबाईल नंबर घेतला. सरपंचाच्या पतीला फोन लावून लावून ‘आम्हाला तुमच्या गावातील विकास कामांची माहिती पाहिजे’ असे सांगितले. गावच्या विकास कामांची माहिती घेण्यासाठी एका बंद खोलीत चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर या चौघांनी ग्रामपंचायत कार्यालयाला आलेला अपंगाचा निधी का खर्च केला नाही अशी विचारणा केली. तसेच गावचे सरपंच गावात न राहता परभणी येथे का राहतात असा प्रश्न विचारुन बातमी चॅनेलवर दाखवण्याची धमकी दिली. बातमी दाखवायची नसल्यास कार चालकाकडे दहा हजार रुपयांचे पाकीट द्या असे सांगण्यात आले.
[amazon_link asins=’B00TFGWAA8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61879651-c33c-11e8-9042-ebd98f4c76ec’]

माखणीच्या महिला सरपंचाचे पती अंकुशराव आवरगंड यांनी पैसे देतो परंतु परभणीला चला, असे त्यांना सांगितले. ताडकळस मार्गे परभणीला यावे लागत असल्याने ताडकळसला येताच अंकुश अवरगंड यांनी या चार भारतीय जनमत या चॅनलच्या पत्रकारांना थेट ताडकळस पोलीस ठाण्यात आणून झालेली सर्व माहिती पोलिसांना सांगितली. अखेर रात्री अकराच्या सुमरास अंकुश गणपतराव आवरगंड यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपी राजेश पुंडलिकराव जोंधळे (मराठवाडा ब्युरो चीफ, भारतीय जनमत चॅनेल), मनिषा बालाजी गंदलवार (रा.पेनुर ता.लोहा .जि. नांदेड,) विक्रम एकनाथराव वाघमारे (रा. बळीरामपुर एम.आय.डि.सी.नांदेड) शिवशंकर रमाकांत हिंगणे (रा. बसवेश्वर नगर सिडको नांदेड) यांच्या विरुद्ध कलम ३८५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार २६ सप्टेंबर रोजी पूर्णा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली व त्यानंतर त्या सर्व आरोपींना जामिनावर सुटका केली. या चॅनलची चर्चा परभणीमध्ये रंगली असून ह्या चॅनलची पूर्ण माहिती काढली असता यांनी नांदेड येथे देखील एकाला फसवले असल्याचे समजले.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’38c65968-c33b-11e8-89ea-c709a4f62605′]

आरोपीची सुटका झाल्यानंतर राजेश जोंधळे यास विचारणा केली असता सदरील सरपंचास पैसे मागितले नाही तरी आमच्यावर हा चुकीचा गुन्हा नोंदविला आहे त्यावर आम्ही संपादकाशी चर्चा केली असल्याचे सांगितले.

गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी

महागड्या नव्या-कोऱ्या कार मध्ये गावात गेल्यानंतर हे बोगस चॅनेल पत्रकार आम्ही थेट केंद्र सरकारच्या आदेशावरुन गावातील विकास कामे तपासायला आलो आहोत, असे सांगायचे. केंद्र सरकारने आम्हाला या भागातील काही गावे निवडून दिली आहेत. त्या गावातील सर्व विकास कामे तपासून केंद्र सरकारला अहवाल सादर करायचा आहे आणि त्याची जनमत दिल्ली या चॅनलवर बातमीपण लावायची आहे, अशी बतावणी ते करायचे. सरपंच नाही भेटल्यास गावातील रेशन दुकानदार हे शोधायचे. रेशन दुकानदार नाही भेटल्यास त्या गावातील शाळेचा मुख्याध्यापक शोधून त्याच्याकडून मलीदा लाटायचे. ताडकळस परिसरातील अनेक गावात आता या बोगस चॅनल पत्रकाराने आपणास कसे फसवले? याच्या कथा रंगत आहेत.