Facebook वर ‘असं’ करा Audio Live

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वात लोकप्रिय असलेल्या फेसबुकने आपल्या कोट्यावधी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणले आहेत. जर तुम्हाला तुमचा आवाज लाखो लोकांपर्यंत पोचवायचाय, चेहरा न दाखवता त्यांना काही सांगायचंय. तर मग फेसबुकनं तुमच्यासाठी चांगली सोय केली आहे.

आपल्या फेसबुक अकांऊंटवरुन जर तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल आणि तुमचा चेहरा दिसू द्यायचा नसेल तर त्यासाठी हे फिचर खुप चांगले आहे. यासाठी तुम्हाला न्यूज फीडच्या टॉपवर जाऊन या फिचर्सचा फायदा घेता येणार आहे.

फेसबुकने नुकतंच Candidate Connect आणि Share You Vote अशी दोन नवीन टूल्स लाँच केले आहेत. त्यात Candidate Connect या टूलवर तुमच्या भागातील लोकसभा उमेदवाराची सगळी माहिती मिळू शकते. अशी नववीन फिचर्स फेसबुक घेऊन येत असून त्याला युजर्सची चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे या Audio Live फिचर्सला देखील युजर्स चांगली पसंती देतील असे फेसबूक कडून सांगण्यात आले आहे.

हे फिचर कसे वापरायचे

फेसबुक अकाऊंटला लॉग इन करा. न्यूज फीडच्या टॉपवर क्लिक करा. तिथे तुम्हाला ‘गो लाइव्ह’चं बटण दिसेल. ते टॅप करा. त्यानंतर समोर दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. तिथे तुम्हाला Live Audio चं बटण दिसेल. त्यावर टॅप करा. असं केल्यानंतर लाइव्ह ऑडिओ सुरू होईल. तुमचे मित्रमैत्रिणी तुमचा आवाज ऐकू शकतात. मात्र, तुम्ही लाइव्ह ऑडिओ करताना लाइव्ह व्हिडिओवर जाता येणार नाही.