निवडणूक प्रचारातून फेसबुकची माघार 

सॅन फ्रान्सिस्को :
राजकीय निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे. त्यामध्ये फेसबुकचा खूप मोठा वाटा आहे. अमेरिकेमध्ये २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या फेसबुकने यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या निवडणुकीतील सहभाग आणि केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनी डेटा लीक प्रकरण यामुळे फेसबुकवर टीका झाल्याच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग होणार नाही हे स्पष्ट करताना फेसबुकनं म्हटलं आहे कि व्यक्तिगतरित्या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून जागतिकस्तरावर उमेदवारांना सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करू  तसेच राजकीय संघटना आजही फेसबुकचा वापर करून मूलभूत प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा जाहिरात मंजूर करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून मदत घेऊ शकतात.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’768bb03f-bd8b-11e8-a06a-dfe4cc3a32e0′]
फेसबुक, ट्विटर आणि गुगलने २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत ‘अर्ध-डिजिटल सल्लागार’ म्हणून काम केलं होतं. त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस  फेसबुकने केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीला अमेरिकेतल्या ८७ दशलक्ष लोकांची माहिती अयोग्य पद्धतीने शेअर केली होती . या  डेटा चोरी प्रकरणी फेसबुकची जगभरात नाचक्की झाली होती. मार्क झुकरबर्गला जाहीर माफीही मागावी लागली होती.
[amazon_link asins=’B07GLS2TRR,B07G5BTYC2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85346fea-bd8b-11e8-8fc0-89d7d88bfee6′]