बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सहभागी होणार ?, जाणून घ्या काय आहे सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांनी बाजी मारली आहे. बायडेन यांची 20 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्रपतिपदी शपथविधी होण्याची शक्यता आहे. कोरोनो व्हायरस साथीमुळे शपथविधी सोहळा साधेपणाने साजरा केला जाण्याची शक्यता आहे. या दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात, या दाव्यासह भारतातील सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचा असा विश्वास आहे की, मनमोहन सिंग बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून भाग घेतील.

जो बायडेन आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आधीपासूनच चांगले संबंध
दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झालेले जो बायडेन आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे चांगले संबंध आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत बायडेन यांनी भारताशी अधिक मजबूत नातेसंबंध जोडले. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा बायडेन हे राज्य सिनेटवर तसेच उपाध्यक्ष होते. 2008 मध्ये, सिनेट परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष असलेले बायडेन यांनी अमेरिकी सिनेटच्या अमेरिका-भारत नागरी अणुकराराला मान्यता देण्यासाठी मनमोहन सिंग यांच्याशी जवळून काम केले.

काय आहे या प्रकरणाचे सत्य ?
जरी या दोन नेत्यांचे आधीच चांगले संबंध आहेत, परंतु Google वर सर्च केल्यानंतर जो बायडेन यांच्याकडून अध्यक्षीय निवडणुकीच्या शपथविधी सोहळ्यात आमंत्रित केल्याचे कोणतेही रिपोर्ट नाही. यासह, मनमोहन सिंग यांच्या कार्यालयानेही अशा प्रकारचे आमंत्रण मिळण्याबाबत नकार दिला आहे. सध्या अमेरिकेच्या निवडणुकीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, यामुळे राष्ट्रपतींच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही. अशा परिस्थितीत आमंत्रणाची बाब योग्य नाही. तसेच, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात सामान्यत: अतिथींचा समावेश असतो, परंतु मुख्य अतिथी नसतो. त्यामुळे मनमोहन सिंग यांना बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देणारी बातमी चुकीची असल्याचे समजते.