Fact Check : सतत मास्क वापरल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होते का? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने जगात कहर केला आहे. दिवसागणिक बाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. देशातही कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. रुग्णसंख्येने २ कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाय योजनाही राबवल्या जात आहे. त्यामध्ये सतत हात धुणे, मास्क लावणे आदी उपाय केले जात आहे. मास्क वापरणे तर अनिवार्य करण्यात आले आहे. संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण तोंडाला मास्क बांधत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये मास्कमुळे शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचे म्हंटले आहे.

 

 

 

 

 

या मेसेजमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. साधारण माणसाला दिवसभरात ५५०लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असते. हि गरज नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. सध्या कोरोना संकटामुळे मास्कचा वापर करतो त्यामुळे आपण दिवसाला २५० ते ३०० लिटरचा ऑक्सिजन घेऊ शकतो. शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त वेळ चेहऱ्यावर मास्क लावल्यामुळे वाढते तसेच ऑक्सिजनची पातळीही खालवते. त्यामुळे सतत मास्क वापरणे धोकादायक ठरू शकतं. असं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या व्हायरल मेसेजची प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक टीमने पडताळणी केली असून हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे म्हंटले आहे. तशी माहिती त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

या टीमने असे म्हंटले आहे, की ऑक्सिजनची पातळी सतत मास्क वापरल्यामुळे होते हा मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे. यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. दरम्यान, कोरोना संकटाशी सामना करताना मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर पाळणं आणि हात वारंवार धुणं हे उपाय परिणामकारक आहेत अशी माहिती पीआयबीने दिली आहे.

परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला कोरोनामुळे देशात बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनभावी अनेकांना जावे लागले आहे. हैदराबादमध्ये दुर्दैवी घटना घडली असून ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने सात कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील सात रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान जो ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला होता तो या रुग्णालयात येत होता. त्याला येण्यास उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.