काश्मीरमध्ये चकमकीत पिंकू कुमारला वीरमरण

बागपत : पोलीसनामा ऑनलाईन – दक्षिण काश्मीरच्या वांगम शोपियान येथे शनिवारी (दि.27) रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बागपतच्या लुहारी गावचा पुत्र शहीद झाला आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच गावावर शोककळा पसरली आहे. मुलगा शहीद झाल्याने कुटुंबात दु: ख आहे, पण भारतमातेच्या संरक्षणासाठी पुत्राने बलिदान दिले ही वस्तुस्थिती देखील आहे.

पिंकू कुमार (वय 38) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. पिंकू कुमार हे 13 सप्टेंबर 2001 रोजी 6 जाट रेजिमेंटमध्ये दाखल झाला होते. 2005 मध्ये त्याचे लग्न मुजफ्फरनगरमधील सोराम गोयला गावात राहणाऱ्या कविताशी झाले होते. त्याच्या मागे वडील जबरसिंग, आई कमलेश देवी, भाऊ मनोज, पत्नी कविता, 10 वर्षाची मुलगी शेली, 8 वर्षाची मुलगी अंजली आणि 8 महिन्यांचा मुलगा अर्णव असा परिवार आहे. कुटूंबाला आणि गावातील लोकांनाही पिंकू शहीद झाल्याबाबत अभिमान आहे. दुसरीकडे, शहीद जवानाच्या दोन्ही मुली वडिलांच्या हौतात्म्याचा अभिमान बाळगून देशाच्या रक्षणाविषयीही बोलत आहेत.