JNU प्रकरण : काँग्रेसनं नेमली ‘सत्य’शोधन समिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे आणि पोलीस लाठीमाराचे प्रकरण धसास लावण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सत्यशोधन समिती नेमली आहे.

या सत्यशोधन समितीमध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव, खासदार हिबी एडन, खासदार सय्यद नासिर हुसेन आणि काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेच्या माजी अध्यक्षा अमृता धवन यांचा समावेश आहे. या समितीने आठ दिवसात माहिती घेऊन त्याबाबतचा अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर करावयाचा आहे.
Congress

पोलीस लाठीमार, हल्ला आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना झालेली आमानुष मारहाण यावरून गदारोळ उडाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष यांनी पंतप्रधान मोदी यांना टिकेचे लक्ष्य करून धारेवर धरले आहे. काँग्रेस पक्षाने एक पाऊल पुढे टाकून सत्यशोधन समिती नेमली आहे. त्यामुळे राजकीय पटलावर हे प्रकरण बराच काळ धगधगत रहाणार हे स्पष्ट झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/