सोशल साईटसवरून आर्थिक फसवणुकी बरोबरच महिलांचे फेक अकाऊंटने ‘हनी ट्रॅप’, ग्रामीण भाग टार्गेट
लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – माणुस गेल्या काही वर्षात मोबाईल शिवाय जगुच शकत नाही इतकी भिषण वास्तवता आपण सर्वच अनुभवत आहोत. त्यातच सोशल मिडीयावर आपण किती व्यस्त आहोत याची एक प्रकारे अहमिकाच दिसुन येते.
पोलीस स्टेशनला एटीएम संदर्भात मोबाईलवर विचारणा करून फसवणुकीचे गुन्ह्यांचे प्रमाण भरपूर आहेत तसेच तसेच ओएलएक्सवर कमी किमतीत वस्तू किंवा गाडी मिळते म्हणून ती घेण्याचे प्रमाणही भरपूर आहे तसेच त्यामध्ये फसवणूक होते हे व्यवहार झाल्यानंतर कळते तसेच ओएलएक्सवर समोरची व्यक्ती ही सैन्यामध्ये कामाला आहे असे भासवून व फोटो आधार कार्ड पॅन कार्ड टाकून समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन फसवणूक करते. आता तर नवीनच फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असुन फेसबुक वर समोरची व्यक्ती महिला असे बोलून फ्रेंड रिक्वेस्ट केल्यानंतर आपल्या बोलण्यामध्ये समोरच्या व्यक्तीला प्रेमात बोलून हनी ट्रॅप मध्ये फसवल्या नंतर आपल्या अंगावरचे कपडे काढून समोरच्या व्यक्तीला कपडे काढण्यास सांगते व व त्याचा नंतर त्याचा व्हिडीओ तयार करून फेसबुक वर युट्युब वर टाकण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली जाते असे प्रकार घडत आहे. तसेच फेसबुकवर दुसऱ्या प्रकारची फसवणूक म्हणजे आपल्या अकाउंट अकाउंट वर आपल्या प्रोफाईल मध्ये जाऊन आपले फोटो सेव करून आपले नावाचे दुसरे अकाउंट तयार करून आपल्या मित्रांनाच पैशाची मागणी केली जाते.
पाॅर्न साईटचा वापर करून युवा पिढी उध्वस्त करण्याचे जे षडयंत्र महाभाग करीत आहेत. त्याला केवळ शहरी भागच नव्हे तर लासलगाव परीसरात देखील मोठे लोण पसरले आहे.
लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात व्हाॅटस अप, अगर फेसबुकसह विविध सोशल साईटसह डाऊनलोड होणारे अॅप युव पिढिच नव्हे तर वयोवृद्ध बळी पडले आहेत. अलिकडे एजन्सीच्या माध्यमातुन व्यवसायाची संधी आहे असे सांगून नवागतांना फसवण्याची नवी पध्दतीने लाखो रूपये लुबाडले गेले आहेत. विंचुर येथे तर एका कंपनीच्या एजन्सीचे आमीष दाखवुन ऑनलाईन पध्दतीने रक्कम घेऊन ती कंपनीच बनावट असल्याचे लक्षात आल्यावर एक गुन्हाही दाखल झाला आहे.
अगदी मोलाची फायदेशीर वाटणारे मोबाईल किती घातकी आहेत. याच्या अनेक घटना आणि हनी ट्रॅपने बोगस महिलाचे अकाऊंटने फसवणुकीने मोठी लुबाडणूक होण्यापासुन आता गुन्हे घडण्यापूर्वीच जनजागृती होण्याची फारच आवश्यकता निर्माण झाली आहे.
लासलगावचे नवनियुक्त सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी याबाबत आता वेगळीच मोहीम हाती घेतली आहे. खात्री पटल्याशिवाय आणि संपुर्ण चौकशी केल्यावरच रक्कमा हस्तांतरीत कराव्यात तसेच बॅकीग सुविधा वापरतांना अधिक लक्ष देण्याची आवश्यकता स्पष्ट केली आहे. जुन्या वस्तु खरेदीबरोबरच आता थेट पोलिस अधिकारी यांच्या नावाने फेक अकाऊंटचा वापर करून बदली झालेल्या अधिकारी यांच्या मित्र परीवाराकडुन उसनी रक्कम ट्रान्स्फर करण्याचा प्रकारही विंचुर येथे घडला आहे.
कांदा व धान्य व्यापारामुळे लासलगाव ,पिंपळगाव बसवंत ल विंचुर भागात अधिक रक्कमेची उलाढाल होत आहे. त्यामुळे आता या भागातील लोकांची फसवणुकीचे मोठे प्रकार कानावर येत आहेत. त्यातही बऱ्याच तक्रारी अगर फिर्यादी फसवणुकीनंतर आपल बदनामी होईल व लोक चेष्टेचा विषय करतील म्हणुन लोक पोलिसांकडे जात देखील नाहीत.याबाबत अधिक माहिती बोलतांना लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी जनजागृती मोहीमेत सर्वांनीच हातभार लावावा असे आवाहन केले आहे.