नगरमध्ये बनावट सौंदर्य प्रसाधने, किराणा माल

अहमदनगर : पेलिसनामा ऑनलाईन – नगर शहरातील घुमरेगल्लीतीत होलसेलरकडून लक्स साबण, डव सँम्पु , सुहाना मसाल, ऐहरेस्ट मसाला, सर्फएक्सल पावडर, हेअर अॅण्ड शोल्डर प्लस सँम्पू , फेरअॅण्ड लवली क्रिम आधी नामांकित  ब्रँडचा बनावट माल विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. कोतवाली पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून दीड लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेचे दिगंबर गेंट्याल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे घरगुती किराणा मालाचे दुकान व फिरस्ते मुलांमार्फत किराणा व साैंदर्य प्रसाधन माल विक्री करण्याचा व्यवसाय आहे. ते किराणा ठोक माल घेवून त्याची किरकोळ स्वरुपात विक्री करतात.

शुक्रवारी त्यांनी खालीद खान (रा- तक्ती दरवाजा, घुमरे गल्ली, नगर) व त्यांचे साथीदार नईम कासम शेख (रा- मुकुंदनगर) यांच्याकडून किराणा व सौंदर्य प्रसादने त्यात लक्स साबन , डव सँम्पु , सुहाना मसाला, ऐहरेस्ट मसाला, सर्फएक्सल पावडर हेड अॅण्ड शोल्डर प्लस सँम्पु, फेरअॅण्ड लवली क्रिम असा 50 हजार रुपयांचा वेगवेगळा माल खरेदी केला होता. त्यांना रोख स्वरुपात रक्कम देवुन बिलाची मागणी केली असता त्यांनी दोन दिवसात बिले देतो, असे सांगितले होते. शनिवारी सदरचा माल विक्री करत असतांना लक्षात आले की, खालीद खान व त्यांचे साथीदार नईम कासम शेख यांच्याकडून घेतलेला किराणा माल व सौंदर्य प्रसाधने हा बनावट आहे. लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणारा असल्याची खात्री झाल्याने दिगंबर गेंट्याल कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांना माहिती दिली. गोकावे यांनी पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना कळविले. त्यांच्या माणसं अकाली मार्गदर्शनाखाली गोकावे यांच्यासह पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे व कोतवालीच्या कर्मचाऱ्यांनी घुमरे गल्ली येथून तब्बल दीड लाख रुपयांचा बनावट किराणामाल हस्तगत केली आहे. नगर शहरात बनावट किराणा मालाचे मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आली आहे. पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.