बिहारमध्ये कोरोना टेस्टिंगमध्ये गडबड, एकाच मोबाइल नंबरवर 26 लोकांची चाचणी

पाटणा : बिहारमध्ये कोरोना चाचणीत कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे, याबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, काही कागदपत्र हाती लागले असून त्यानुसार स्पष्ट होते की, बिहारमध्ये कोरोना चाचणीचा आकडा वाढवून दाखवण्यासाठी बनावट मोबाइल नंबरवरून बनावट लोकांच्या नावाचा वापर केला गेला आहे. हे सुद्धा समजले आहे की, रजिस्टरमध्ये गडबड करून कोरोना चाचणी किटमधून नफा कमावण्यात आला.

बरहट प्राथमिक आरोग्य केंद्र घोटाळ्याचे केंद्र
आजतकने मिळालेल्या कागदपत्रांचा संदर्भ देत म्हटले आहे की, बरहट प्राथमिक आरोग्य केंद्रावर अशाच प्रकारचा घोटाळा समोर आला आहे. येथे 26 लोकांची तपासणी झाली होती त्यांचा मोबाइल नंबर (88#####90) एकच आहे. आश्चर्यकारक म्हणजे, हा नंबर रोजंदारी मजूराचा आहे जो बांका जिल्ह्यात राहतो.

आजतकशी फोनवर बोलताना बैजू रजकने सांगितले की, माझे नाव राजू रजक आहे आणि बांकामध्ये राहतो. मी आजपर्यंत कधीही माझी कोरोना चाचणी केलेली नाही.

हे 26 लोक ज्यांचा मोबाइल नंबर एकच आहे त्यांच्यापैकी 11 पुरुष, 6 महिला आणि 9 मुले आहेत. बरहट प्राथमिक आरोग्य केंद्रावरच असेच एक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये ज्या 11 लोकांच्या चाचणीचा दावा करण्यात आला आहे त्यांचा मोबाइल नंबर सुद्धा एकच आहे.

हा घोटाळा समोर आल्यानंतर घाईगडबडीत जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशावर बरहट प्राथमिक आरोग्य केंद्रावर चौकशी पथक पोहचले आणि पूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तर आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी म्हटले की, त्यांना कोरोना चाचणीच्या संख्येतील घोटाळ्याची माहिती नाही. मंगल पांडे यांनी म्हटले, या प्रकरणाची पूर्ण माहिती घेत आहे.

या प्रकरणावर आरजेडी प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी म्हटले, प्रकरणात मोठ्या प्रमाणात बनावट लोकांची नावे देऊन पैसे उकळण्यात आले आहेत. बनावट नावे आणि बनावट मोबाइल नंबर सर्व दाखवण्यात आले आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. आम्ही मागणी करतो की, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, जेणेकरून सत्य समोर यावे.

तर तेजस्वी यादव यांनी म्हटले की, मी अगोदर सुद्धा बिहारमध्ये कोरोना घोटाळ्याची भविष्यवाणी केली होती. जेव्हा आम्ही घोटाळ्याचा डेटा जाहीर केला होता तेव्हा सीएमने नेहमीप्रमाणे नकारला होता.

यांनी अँटीजेनचे ते अमृत मंथन केले आहे ज्यात 7 दिवसात प्रतिदिन टेस्टचा आकडा 10 हजारवरून 1 लाख आणि 25 दिवसात 2 लाखांच्या पुढे नेला.

बिहारमध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत एकुण 2 कोटी 16 लाख 64 हजार 852 लोकांची कोरोना तपासणी झाली आहे. बिहारमध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत एकुण 2,61,447 लोक पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच कोरोनाने 1518 लोकांचा मृत्यू झाला आहे.