सावधान ! बनावट पासपोर्ट बनवणार्‍या ‘या’ ७ वेबसाईट तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटरवर उघडू नका

मुंबई : वृत्तसंस्था – बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या वेबसाईटपासून सावध राहण्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. तसेच वेबसाईचटी लिंक तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरवर उघडू नये, अशा सुचना देखील परराष्ट्र मंत्रालयाने दिल्या आहेत. कारण या वेबसाइट्स चालवणारे तुमचे बँक अकाऊंट काही क्षणात रिकामं करू शकतात. जर पासपोर्ट बनवायचा असेल तर www.passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पासपोर्ट काढण्यासाठी शासनाकडून ठराविक रक्कम आकारली जाती. मात्र काही बनावट वेबसाईट सुरुवातीला कमी पैशात पासपोर्ट काढून देण्याचे अमिष दाखवतात आणि त्यानंतर तुमचे वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील चोरून तुमचे बँक खाते रिकामे करु शकतात. शासनाच्या पासपोर्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज केला तर तुम्हाला अधिकृत पासपोर्ट मिळू शकतो. मात्र, सध्या पासपोर्ट काढून देण्याऱ्या बनावट वेबसाईटचा सुळसुळाट झाला आहे.

अधिकृत वेबसाईट खेरीज कोणत्याही साईटवर तुम्ही तुमची माहिती शेअर करू नका. जर तुम्ही तुमची वैयक्तीक माहिती बनावट वेबसाईटवर शेअर केली तर तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे पासपोर्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करावा असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

‘या’ आहेत बनावट वेबसाईट
– www.indiapassport.org
– www.indiapassport.org
– www.passport-seva.in
– www.online-passportindia.com
– www.passportindiaportal.in
– www.passport-india.in
– www.applypassport.org

आरोग्यविषयक वृत्त

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य