Mahesh Manjrekar | प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त; मुंबईत झाली शस्त्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिनेसृष्टीतील एक आघाडीचे असणारे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर मूत्राशयाच्या कर्करोगाची (Bladder Cancer) शस्त्रक्रिया (Surgery) झालं आहे. काही दिवसापूर्वी महेश मांजरेकर यांना मुंबईमधील रुग्णालयात (Mumbai Hospital) दाखल करण्यात आले होते. साधारण 10 दिवस अगोदर त्यांच्यावरील ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. तर शस्त्रक्रियेनंतर मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे घरी परतले असून त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर काम करत होते. ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात मांजरेकरांनी मद्यपीची भूमिका केली होती. आता ते हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करत असून त्यात सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान, यापूर्वी प्रामुख्याने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी दिग्दर्शित केलेले वास्तव व अस्तित्व हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात 1984 साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दोन स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत.

दरम्यान, त्यांनी वाँटेड, जिंदा, रन, ओएमजी, ओह माय गॉड’ यांसोबत अन्य काही हिंदी चित्रपटांमध्ये
भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी वास्तव, कुरुक्षेत्र, विरुद्ध’ या हिंदी आणि नटसमाट, फक्त लढ म्हणा, मी शिवाजी पार्क’ या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी ‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोचे देखील सूत्रसंचालन सुद्धा केले आहेत.

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा पुन्हा वाढणार पगार, जाणून घ्या यावेळी किती होईल वाढ; ‘या’ पध्दतीनं करा कॅलक्युलेशन

SBI Alert | PAN Card बाबत असा मेसेज येतोय? तर वेळीच व्हा सतर्क, अन्यथा…

Bank Locker Rules Changed | जर वर्षातून एकवेळा बँक लॉकर उघडला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता, बँक उचलू शकते ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  famous director and actor mahesh manjrekar undergoes surgery for bladder cancer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update