घटस्फोटीत हृतिकसोबत लग्न करण्याची ‘या’ कमी वयाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची इच्छा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   साऊथमधील फेमस अ‍ॅक्ट्रेस तमन्ना भाटीया आपल्या अॅक्टींगसोबतच आपल्या लुकसाठीही फेमस आहे. तमन्नानं आतापर्यंत तिच्या प्रत्येक सिनेमात नो किसिंग पॉलिसी फॉलो केली आहे. परंतु एका अभिनेत्यासाठी ती तिची ही नो किसिंग पॉलिसी तोडण्यासाठी तयार असल्याचं आणि त्याच्यासोबदत लग्न करण्याची इच्छा असल्याचं तिनं सांगितलं आहे. खास बात अशी की हा अभिनेता बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांपैकी आहे.

एका मुलाखतीत(चॅट शोमध्ये) तमन्नाला विचारण्यात आलं की, तिचं जर स्वयंवर झालं तर तिला कोणत्या अभिनेत्यांना बोलवायला आवडेल. यावर बोलताना तमन्नानं कोणाला किस करण्याची इच्छा आहे हेही सांगितलं आहे तमन्ना म्हणाली, “मी माझ्या स्वयंवरासाठी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, विकी कौशल आणि प्रभासला बोलवेन. मी नेहमीच ऑनस्क्रीन नो किसिंग पॉलिसी फॉलो करते. माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं लिहलेलं असतं. परंतु मला हृतिकसोबत एखादा सिनेमा करायला मिळाला तर मी ही पॉलिसी तोडू शकते.” असं ती म्हणाली.

तमन्नाच्या स्टेटमेंटवरून लक्षात येतंय की, तिला घटस्फोट झालेल्या आणि दोन मुलांचा बाप असणाऱ्या हृतिकसोबत लग्न करण्याची इच्छा आहे.

हृतिकसोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना तमन्ना म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच मी हृतिकला भेटले. जवळ जवळ मी त्याच्यावर आपटलेच. मी त्याला सांगितलं की, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. तुला भेटून खूप छान वाटलं. यावर ओके बोलून तो पुढे निघून गेला. नंतर तो वळून मला म्हणाला, माझ्या सोबत फोटो काढायचा आहे का. तर मी त्याला होकार दिला.” तमन्ना तिचा आणि हृतिकचा फोटो सोशलवर शेअर केला होता जो व्हायरल होताना दिसला.

तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत बोले चूडिया या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय सीटीमार या तेलगू सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तमन्नानं चांद सा रोशन चेहरा या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मनासारखं काम न मिळाल्यानं तिनं तेलगू आणि तमिळ सिनेमात काम करण्यास सुरूवात केली. तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. हिंमतवाला, द हमशकल्स, खामोशी, बाहुबली, रिबेल, से रा नरसिंहा रेड्डी, अयान, पैरा, सिरुथई, धर्मा दुरै असे अनेक तिचे सिनेमे सांगता येतील.