‘स्टार’ बॅट्समन डेव्हिड वॉर्नरला प्रेक्षकांनी दाखविले ‘सँडपेपर’ ! (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्‍या अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर स्थानिक चाहत्यांनी सँडपेपर दाखविला. बर्मिंघॅमच्या एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पहिल्या डावाच्या चौथ्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला २ धावांवर बाद केले.

वॉर्नर बाद झाल्यानंतर पॅव्हिलियनच्या दिशेने जात असताना काही दर्शकांनी त्याला सँडपेपर दाखविले. इंग्लंड क्रिकेटच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात काही फॅन्स सॅंडपेपर दाखवताना दिसत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केपटाऊनमध्ये बॉल टेंपरिंगसाठी दोषी ठरविण्यात आले होते. यामुळे वॉर्नर आणि स्मिथवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती, तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. तिघेही आता कसोटी संघात परतले आहेत. वर्ल्ड कप -२०१९ दरम्यानही वॉर्नर आणि स्मिथला प्रेक्षकांच्या हुर्योला तोंड द्यावे लागले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like