Farmer Suicide In Baramati | बारामतीत शेतकऱ्याची आत्महत्या, पाटबंधारे विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Farmer Suicide In Baramati | राज्यात नापिक किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, बारामतीमध्ये पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याने व्हिडीओ काढून आत्महत्या केली. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे शेतकऱ्याने व्हिडीओतून सांगितले आहे.

ही घटना बारामती तालुक्यातील लाटे या गावात घडली असून हनुमंत सणस असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलीस त्यांना कशाप्रकारे त्रास देत होते याची आपबिती सणस यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओतून सांगितली. या तिन्ही विभागाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून सणस यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

काय म्हणाले हनुमंत सणस?

आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडीओमध्ये हनुमंत सणस म्हणाले, मी हनुमंत 26 फेब्रुवारी 2024 ला आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मला इतका त्रास दिला आहे. मी या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझे वय 70 वर्ष आहे. माझ्या वावरात अतिक्रमण करुन मला दम देतात. माझ्या खिशात या संदर्भात चिठ्ठी लिहली आहे. वारंवार तक्रर देखील करुन पोलिसांनी उलट मला, माझ्या भावाला आणि मुलाला दम दिला. जिथे अतिक्रमण केले त्याच जागेत मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत ते माझ्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी.

सणस यांचा व्हिडीओ व्हायरल

हनुमंत सणस या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे बंधू जयवंत सणस म्हणाले, स्थानिक पोलिसांनी देखील आम्हाला त्रास दिला.
बारामती तालुक्यातील लाटेमध्ये क्षेत्र सणस यांचे आहे.
सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युत धारक विद्युत पंप बसवलेले असताना
त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले. सणस यांचे रान मोकळे केले.
त्यानंतर हनुमंत सणस आणि त्याचा भाऊ त्या रानात जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले.
त्यावेळी सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करु अशी धमकी देखील काही लोकांनी दिली.
त्यानंतर वारंवार पोलीस स्टेसन मधून हनुमंत सणस आणि त्यांच्या भावाला फोन येऊ लागले.
या भीतीला घाबरून हनुमंत यांनी आत्महत्या केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | शरद पवारांचे बेरजेचे राजकारण सुरूच, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी प्रवेश करणार

Keshav Nagar Mundhwa Crime | पुणे : प्रेम संबंधामध्ये दुरावा, तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसच्या आबा बागुल यांचे मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न दोन वर्षांनी प्रत्यक्षात ! बागुल यांनी घेतली फडणवीस, बावनकुळे यांची भेट