सरकारने कृषी कायद्याचा पुनर्विचार करावा, शेतकर्‍यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये : शरद पवार

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – शेतकरी कृषी कायद्याविरोधात ठाम आहेत, तर सरकारही माघार घेण्याच्या मन: स्थितीत नाहीत. दिल्लीत गतिरोध सुरू आहे. दरम्यान, विरोधी पक्ष मोदी सरकारवर हल्ला करण्याबरोबरच सल्लाही देत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर पुनर्विचार करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले की, सरकारने कृषी कायद्यांवर पुनर्विचार करायला हवा, हे कायदे चर्चेविना पारित झाले होते, सर्वांनी सरकारला यावर चर्चा करण्यास सांगितले होते, परंतु विरोधकांना मागे टाकून संसदेच्या घाईत सरकारने कृषी कायदे पास केले.

माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले की, आता केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या मागणीकडे लक्ष देण्याच्या मूडमध्ये नाही. म्हणून हे आंदोलन सुरूच राहिल. सध्या हे आंदोलन दिल्लीच्या सीमेपर्यंत मर्यादित आहे. योग्य वेळी निर्णय न घेतल्यास हे आंदोलन इतर ठिकाणी पसरेल. शेतकर्‍यांच्या संयमाची परिक्षा घेऊ नये ही विनंती.

किसान आंदोलनाचा आज सोळावा दिवस असून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर अडून बसले आहेत. सरकारचे सर्व प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. या विषयावर आज कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकर्‍यांना हे आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले. त्यासोबतच एक नवा प्रश्न उपस्थित केला आहे.

टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी देशद्रोहाचे आरोपी शरजील इमामचे पोस्टर लावले होते आणि त्याच्या सुटकेच्या घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे काय करायचे असा प्रश्न विचारला. ते म्हणाले की, हे धोकादायक आहे आणि शेतकरी संघटनांनी त्यापासून स्वत: ला दूर ठेवले पाहिजे.