शेतकऱ्याचा मुलगा भारतीय सैन्यात शास्त्रज्ञ

पंढरपुर : पोलीसनामा ऑनलाईन

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पुर्ण करणारा धनंजय राजमाने यांनी भारतातील सर्वात मोठी लष्करी संशोधन आणि विकास संस्था डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO मध्ये महाराष्ट्राचा मानाचा झेंडा उच्च फडकावला आहे.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊनही आपल्या मिरिटच्या जोरावर त्यांने आपले शिक्षण पूर्ण केले. वडील व्यवसायाने शेती करतात. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये पंढरपूर तालुक्यातील पळशीच्या धनंजय राजमाने या तरुणाची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागात शिक्षण झाल्यानंतरही सांगली इथल्या वालचंद कॉलेजमधून बीटेकची पदवी घेतली. त्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली मात्र, शिक्षणाची ओढ शांत बसू देत नसल्याने त्याने मद्रास IIT साठी तयारी सुरु केली. नोकरी करत त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि दरम्यान DRDOची जाहिरात पाहण्यात आल्यावर त्याने यासाठीही अर्ज दाखल केला व देशात पहिला नंबर मिळवत सैन्यदलात शास्त्रज्ञ बनण्याचा मान मिळवला. देशातील जवळपास दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी अर्ज केला होता.

पळशी गावात धनंजय हा एकत्रित शेतकरी कुटुंबात वाढला असून घरातील पहिला उच्च शिक्षण घेणारा तरुण आहे. घरातील सगळेच त्याला शिक्षणाला प्रोत्साहन देत होते. या विषयी धनंजयला विचारले असता तो म्हणाला, “ ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीची भीती वाटत असली तरी त्यांच्याच आत्मविश्वास आणि कष्ट करायची तयारी जास्त असते.” एखाद्या विषयाची डिग्री घेतल्यानंतर त्यातच पुढे शिक्षण घेणं चांगलं असताना अनेक तरुण स्पर्धा परीक्षांच्या मागे धावतात. मात्र मूळ ज्या विषयात शिक्षण घेतले त्यातच तुम्ही अभ्यास करत राहिल्यास अनेक चांगल्या संधी उपलब्ध असल्याचे धनंजय यांनी सांगितले.

इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यातच आवड असल्याने IIT कष्ट करुन प्रवेश मिळाला. पण याचवेळी सैन्यदलातील या संधीला आत्मविश्वासाने सामोरे जात त्यांने हा अवघड गड सर केला. देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी घेतलेल्या मुलाखतीत नुसता उत्तीर्ण नाही तर देशात पहिला येण्याचा मान ही मिळवला. भारतीय सैन्यदलातील शस्त्रे व इतर मिसाईल कार्यक्रम विकसित करण्याची इच्छा असून याबाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास धनंजयने व्यक्त केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8c9a075-bfdb-11e8-b0ae-f53e13352625′]

धनंजयचे स्वागत व कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. धनंजय नेमका काय झाला हे समजत नसलं तरी तो सैन्यात मोठा साहेब झाल्याची गावकऱ्यांची भावना आहे. सध्या गावभर त्याचे सत्कार सुरु आहेत. धनंजयला मिळालेले यश पाहून गावातील इतर मुलांनी प्रेरणा घ्यावी अशीच ग्रामस्थांची इच्छा आहे. धनंजयच्या वडीलांना सैन्यात जायचं होते पण त्यांची निवड होऊ शकली नाही. आता मात्र धनंजयच्या रुपाने त्यांचे सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. आपणच भारतीय सैन्यात दाखल झाल्याचा आनंद धनंजयच्या वडीलांनी व्यक्त केला.

का घेत नाही मोदी-शहा ‘मनोहर पर्रीकर’ यांचा राजीनामा ?

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1e20198-bfdc-11e8-bda7-375a991c5459′]