काश्मीरी पंडितांकडून ‘मोदी-मोदी’चे नारे ; फारूक अब्दुलांना ‘धक्‍का-बुक्‍की’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर आणि काश्मीरी पंडीत हा मुद्दा तापलेला असताना, काश्मीरमध्ये एक मोठी घटना घडली आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरंसचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. फारूक अब्दुल्ला यांना श्रीनगर येथे जेष्ठा देवी मंदिराच्या बाहेर काश्मिरी पंडितांनी धक्काबुक्की केली आहे. सध्या देशभरातील काश्मिरी पंडित काश्मीरमध्ये होणाऱ्या काही मंदिरांच्या यात्रांनिमित्त गेले आहेत.

काश्मिरी पंडितांचे ‘मोदी-मोदींचे’ नारे
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला हे जेष्ठा देवी मंदिरात काश्मिरी पंडितांची भेट घेण्यासाठी पोहचले होते, परंतू फारुक अब्दुल्ला मंदिर परिसरात पोहचताच काश्मिरी पंडितांनी ‘मोदी-मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ असे नारे देण्यास सुरुवात केली, या घटनेनंतर फारुक अब्दुल्ला यांना संबोधित न करताच जाण्याची मागणी केली आणि मंदिरात घुसण्यास देखील मज्जाव केला. यावेळी काश्मिरी पंडितांनी त्यांना खोऱ्यातून का हकलण्यात आले यावरुन देखील अब्दुल्ला यांना प्रश्न केला.

जेष्ठा देवी मंदिरात काश्मिरी पंडित दरवर्षी पूजा करण्यासाठी जमा होतात. याचमुळे अनेक काश्मिरी पंडित जेष्ठा देवीच्या मंदिरात पोहचले. याच निमित्त फारूक अब्दुल्ला मंदिरात जाणार होते. परंतू अब्दुल्ला पोहचण्याआधीच काश्मीरी पंडित तेथे जमा झाले होते, यात महिला आणि पुरुषांचा देखील समावेश होता. फारूक अब्दुल्ला तेथे पोहचताच काश्मिरी पंडित भडकले त्यांनी त्याच्याविरोधात नारे बाजी सुरु केली. अब्दुल्लांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र काश्मिरी पंडित ऐकण्यास तयार नव्हते.

काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडिताचा मुद्दा पेटलेला आहे. काश्मिरी पंडित अनेक वर्षांपासून खोऱ्यात परतता यावे यासाठी ते मागणी करत आहेत. भाजप देखील काश्मीरी पंडितांचा मुद्दा कायम उचलून धरत आहे. परंतू नॅशनल कॉन्फरंस या विषयावर बोलण्यास तयार नाही.

आरोग्य विषयक वृत्त

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे