‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

जम्मू : पोलीसनामा ऑनलाईन –  गेले वर्षभर कोरोनामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. याच दरम्यान उद्भवलेल्या एका अजब परिस्थितीचा किस्सा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांनी रविवारी (दि. 17) लोकांना ऐकवला आहे. जेव्हापासून कोरोनाचे संकट आले आहे, तेंव्हापासून पत्नीच चुंबनही घेतलं नाही, अब्दुलांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांच्या या विधानाची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

फारूक अब्दुला नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अब्दुला म्हणाले की, कोणीही हात मिळवणे अथवा मिठी मारण्यापासून घाबरत आहेत. मी स्वत:च्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही मग मनात असूनही मिठी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अब्दुला यांनी पहिल्यांदा नाही तर यापूर्वीही अशी विधाने केली होती. यापूर्वी 27 मार्च 2018 रोजी फारूक अब्दुला यांच्याकडून संसद भवनात असाच प्रकार घडला होता. अब्दुला यांनी काही स्थानिक चॅनेलला प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी काही महिला पत्रकार माईक घेऊन त्यांच्याकडे पोहचली, त्यावेळी फारूक अब्दुला यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मस्करीमध्ये कोणीही मला या महिलांकडून वाचवा असे म्हणाले होते.