Fatty Liver | फॅटी लिव्हरमुळे असाल त्रस्त तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, असा होईल लाभ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fatty Liver | लिव्हर (Liver) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो शरीरात अनेक कार्य करतो. लिव्हर अन्नातील सर्व पोषक घटक जसे की व्हिटॅमिन, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट (Vitamins, Minerals, Antioxidants) वेगळे करते आणि शरीराच्या गरजेनुसार शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवते. रक्तातील विषारी पदार्थ (Toxic Substances In The Blood) बाहेर काढण्याचे कामही लिव्हर करते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे लोकांचे लिव्हर कमी वयात फॅटी होत आहे (Fatty Liver).

 

फॅटी लिव्हर (Fatty Liver) ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यात लिव्हरमध्ये चरबी (Fat) जमा होऊ लागते. फॅटी लिव्हरची अनेक कारणे आहेत, जसे की तेलकट अन्नाचे अतिसेवन, मद्यपान, अनावश्यक औषधांचे सेवन, हिपॅटायटीस सी विषाणूचा संसर्ग आणि खराब जीवनशैलीमुळे (Overeating Oily Food, Alcohol, Taking Unnecessary Drugs, Hepatitis C Virus Infection And Bad Lifestyle) हा आजार वेगाने पसरत आहे.

 

या रोगाच्या लक्षणांबद्दल बोलताना, बहुतेक लोक त्याची लक्षणे दर्शवत नाहीत, परंतु काही लोकांना ओटीपोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात.

 

फॅटी लिव्हरची लक्षणे (Symptoms Of Fatty Liver) :

1. थकवा जाणवणे (Feeling Tired)

2. मळमळ होणे (Nausea)

3. भूक न लागणे (Loss Of Appetite)

4. लिव्हर खराब झाल्याय डोळे पिवळे होणे (Yellowing Of Eyes Due To Liver Damage)

5. पोटात पाणी होणे

6. रक्ताच्या उलट्या होणे (Vomiting Of Blood)

7. मानसिक गोंधळ (Mental Confusion)

8. कावीळ (Jaundice)

प्रोफेसर (डॉ.) राहुल राय, सल्लागार, लिव्हर डिसिज आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन, नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जयपूर यांच्या मते, फॅटी लिव्हर ही अशी समस्या आहे ज्यामध्ये आहार (Dirt) खूप महत्वाचा आहे. जर तुमचे लिव्हर फॅटी असेल तर काही खास फळांचा आहारात समावेश करा जेणेकरून लिव्हर निरोगी (Liver Healthy) राहील. फॅटी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी कोणती फळे प्रभावी आहेत ते जाणून घेऊया.

 

फॅटी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी फळे (Effective Fruits For Keeping Fatty Liver Healthy)

1. डाळिंब (Pomegranate) :
व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असलेले डाळिंब इम्युनिटी (Immunity) मजबूत करते आणि रोगांपासून देखील सुरक्षित ठेवते. आहारात डाळिंबाचे नियमित सेवन केल्यास शरीर निरोगी राहते. शरीरातील रक्ताची कमतरता डाळिंबाच्या सेवनाने पूर्ण होते. हे शरीरातील हिमोग्लोबिन (Hemoglobin) आणि प्लेटलेट्स (Platelets) वाढवण्यासाठी प्रभावी आहे.

 

2. पपई (Papaya) :
पपई हे असेच एक फळ आहे जे लिव्हरच्या समस्येवर खूप फायदेशीर ठरते. पपईमध्ये फायबर, कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, ई, ए (Fiber, Carotene, Vitamin C, E, A) आणि इतर अनेक खनिजे असतात जे लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवतात. पपईच्या नियमित सेवनाने पोटाच्या गंभीर समस्यांपासून सुटका मिळते.

 

3. सफरचंद (Apple) :
सफरचंद खाल्ल्याने लिव्हर निरोगी राहते, रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजार टाळता येतात. लिव्हरच्या आरोग्यासाठी फळे खायची असतील तर सफरचंद खा.

 

4. नाशपती (Pear) :
फळांमध्ये नाशपतीचे सेवन केल्याने लिव्हर निरोगी राहते. यात हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म (Hepatoprotective Properties) आहेत, जे लिव्हरला कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून वाचवतात. जर तुमचे लिव्हर फॅटी झाले असेल तर आहारात नाशपती खा.

 

5. द्राक्षे (Grapes) :
द्राक्षे खायला चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. हिरव्या, काळ्या, लाल द्राक्षांमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्व असतात, ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. द्राक्षे हे एक फळ आहे जे लिव्हर डिटॉक्स (Detox) करते, तसेच लिव्हरमधील सूज, संसर्ग कमी करते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fatty Liver | these 5 best fruits can help in curing fatty liver naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Remedy For Joint Pain | सांधे दुखीवर ‘ही’ पाने आहेत रामबाण उपाय, वाचा सविस्तर

 

The Effects Of Smoking | स्मोकिंग केल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या

 

Diabetes Symptoms | टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये काय आहे अंतर? जाणून घ्या त्याची लक्षणे कशी ओळखावीत