स्विगी, फुडपांडा, झोमॅटोवरून ऑर्डर करत असाल तर सावधान…. 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन 
खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांना एफडीआयने  नोटीस पाठवली आहे. यामध्ये स्विगी, फूडपांडा, झोमॅटो, उबर ईट्स यांचा समावेश आहे. या कंपन्या अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ ग्राहकांना पुरवत असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे या कंपन्यांना एफडीआयनं नोटीस बजावली आहे. तसंच ज्या हॉटेल्समधून हे खाद्यपदार्थ दिलं जातं, अशा मुंबईतल्या ११३ केंद्रांकडे परवाना नसल्याचंही एफडीआयच्या पाहणीत निदर्शनास आलं आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’070e0362-cd1b-11e8-b8e4-c32e07bc6915′]
ई-कॉमर्स आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात अन्नपदार्थही ऑनलाईन पद्धतीने मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या ऑनलाईन अॅप आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून अन्नपदार्थ पुरवण्याऱ्या कंपन्यांच्या आस्थापना विनापरवाना आणि अस्वच्छ ठिकामी सुरु असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीतून समोर आली आहे.
[amazon_link asins=’B072F6Y8MS,8178692546′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’244e922e-cd1b-11e8-aa2c-8de018e92dd5′]
एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ३४७ खाद्यपदार्ध बनवणाऱ्या केंद्रांना  भेटी दिल्या. यातील ११३ केंद्राची  नोंद अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेली नाही. यातील ८५ केंद्र  स्विगी, ५० केंद्र  झोमॅटो, ३ केंद्रफूडपांडा आणि २  केंद्र उबरईट्सशी संलग्न आहेत. या सर्व केंद्रांना नोटीस पाठवण्यात आल्या असून त्यांच्या उत्तरानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन ऑर्डर स्वीकारणाऱ्या कंपन्यांकडून कोणत्या वातावरणात अन्नपदार्थ तयार केले जातात, याची तपासणी एफडीआयकडून करण्यात आली. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अतिशय खराब वातावरणात तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ या कंपन्यांकडून ग्राहकांना पुरवले जात असल्याचं यातून दिसून आलं. यामध्ये स्विगी, फूडपांडा, झोमॅटो, उबर ईट्स या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B077ZRH6QY,B00QWQ11O0,B07F8ZQ4QG,B06WWKQ19Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3090b19f-cd1b-11e8-809d-bf169eb31ba9′]
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबत ही कारवाई केली.