वकिल – पोलीस हाणामारीत महिला आयपीएस अधिकाऱ्यांची छेडछाड ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील तीस हजारी कोर्टाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या हिंसाचारात एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांची छेडछाड झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असून त्यांचे पिस्तुलही गायब झाले आहे. मात्र, पोलीस दबावाखाली असल्याने याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Image result for lawyer police delhi

दिल्लीत झालेल्या या हाणामारीत वकिलांनी पोलीस ठाण्यात शिरुन पोलिसांना मारहाण केली. यावेळी एक महिला आयपीएस अधिकारी गणवेशात होत्या. त्यांचे पिस्तुल चोरीला गेल्याचे सांगण्यात येते. त्यांची छेडछाड केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, सध्या पोलीस इतके दबावाखाली आहेत की, त्यामुळे या महिला अधिकाऱ्यांनी आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाविषयी फिर्याद दिली नाही. तसेच पिस्तुल चोरीला गेल्याचीही तक्रार देण्यात आली नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

Related image

वकिलांकडून पोलिसांना झालेल्या मारहाणीबाबत दिल्ली पोलिसांमध्ये प्रचंड खदखद माजली आहे. असे असताना दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना निलंबित करण्याचा एकतर्फी आदेश दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या मारहाणीविरोधात देशभरातील वकिल निषेध, मोर्चे काढत आहेत. मात्र, वकिलांनी पोलिसांना केलेल्या मारहाणीबाबत कोणी बोलत नाही, हे पाहून देशभरातील पोलिसांमध्ये चिड निर्माण झाली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसांना भेट देण्याचे सौजन्य पोलीस आयुक्तांनी न दाखविल्याने दिल्ली पोलीस प्रचंड चिडले. त्याचा परिणाम पोलिसांनी तब्बल ११ तास आंदोलन केले होते.
वकिल टीव्ही चॅनेलवर जोर जोरदार त्यांची बाजू मांडत आहेत. मंत्री स्वत: वकिल आहेत. संपूर्ण राजकीय पक्ष त्यांच्या बाजूने बोलत आहेत. पोलिसांना मात्र, त्यांची बाजू मांडता येत नाही. यामुळे देशभरातील पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

Image result for lawyer police delhi

वकिलांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करत कायदा धाब्यावर बसविला आहे. गेले तीन दिवस कोणालाही कोर्टात जाऊ दिले नाही, संपूर्ण न्याय व्यवस्था वकिलांच्या आंदोलनामुळे बंद पडली आहे, तरीही त्याविषयी कोणी बोलत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या दृष्टीने एक सुखद घटना गाजियाबादमध्ये घडली. गाजियाबाद पोलीस यांच्या नातेवाईक व शुभचिंतकांनी बुधवारी सायंकाळी कँडल मार्च काढून या मारहाणीचा निषेध व्यक्त केला.

Image result for lawyer police delhi candle march

Visit : Policenama.com