महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर पोलीसनामा ऑनलाइन

जामखेड येथील महिला पोलिस कर्मचाऱ्याने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे . यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनाली जाधव असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्राथमिक माहीतीनुसार कौटुंबीक वादातुन ही घटना घडल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत.