CAA विरोधातील ‘आंदोलना’मध्ये विदेशींचा ‘हात’, रामदेव बाबांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएए विरोधात देशात आणि विविध राज्यांमध्ये आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनामध्ये काही राजकीय पक्ष आणि विदेशींचा हात आहे. देशात हिंसेचं वातावरण निर्माण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप रामदेवबाबा यांनी केला आहे. रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.

सीएए आंदोलनादरम्यान आझादीच्या घोषणा दिल्या जात आहेत. हे चुकीचे आहे. हा देश प्रत्येकाचा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सीएए कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी देशातील नागरिकांशी या कायद्याचं काहीही देणंघेणं नसल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषदेत दिली. रामदेव बाबांनी पुढे सांगितले की, काही लोक अल्पसंख्यांकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात हिंसेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. काही राजकीय पक्ष आणि विदेशींचा हात यामध्ये आहे.

विरोधकांनी देशाचा फायदा पहावा
देशातील बेरोजगारी आणि महागाईवर काम करण्याची गरज आहे. विरोधी पक्षांनीही देशाचा फायदा कसा होईल हे पहायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नाही. देशात यापूर्वी अनेक घोटाळे झाले मात्र आपल्याला आता या मुद्यावर लक्ष करायला पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like