×
Homeक्रीडाFIFA World Cup 2022 | 'हा खरा फुटबॉल' ! अर्जेंटिनाच्या पराभवानंतर फुटबॉलपटू...

FIFA World Cup 2022 | ‘हा खरा फुटबॉल’ ! अर्जेंटिनाच्या पराभवानंतर फुटबॉलपटू लुईस फिगोची प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – FIFA World Cup 2022 | “मला वाटते हा फुटबॉल आहे, हा खेळ आहे. याचा परिणाम होईल असे सुरूवातीला कोणीही म्हणू शकत नव्हते. पण हा सामना बघताना अजिबात आश्चर्य वाटले नाही. यासाठी सौदी अरेबियाचे अभिनंदन करायला हवे, असे मला वाटते.” अशी प्रतिक्रिया पोर्तुगालचे दिग्गज खेळाडू लुईस फिगो यांनी दिली. (FIFA World Cup 2022)

 

फिफा विश्वचषक 2022 मध्ये तिसऱ्या दिवशी मोठी उलटफेर पाहायला मिळाली. यामध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाच्या संघाला सौदी अरेबिया संघाकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. अर्जेंटिनाचा झालेला पराभव पाहून फुटबॉल प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मेस्सीच्या संघाच्या पराभवावर पोर्तुगालचे दिग्गज खेळाडू फिगो आणि सोल कॅम्पबेल यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “सर्व खेळाडू प्रशिक्षकाच्या योजनेबाबत अगदी स्पष्ट होते. सामन्यादरम्यान त्याने खूप मेहनत घेतली आणि मला आश्चर्य वाटले की तो अशा स्तरावर खेळू शकतो. मला खरोखरच आश्चर्य वाटत आहे आणि त्यांच्या खेळाचे अभिनंदन करायचे आहे.”

काय घडलं सामन्यात?
अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया यांच्यातील सामन्यात कर्णधार मेस्सीने 10 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
ही आघाडी अर्जेंटिनाने हाफ टाईमपर्यंत कायम ठेवली.
मात्र हाफ टाईमनंतर सौदी अरेबियाने सात मिनिटांत दोन गोल करून 2-1 अशी आघाडी घेतली.
सौदी अरेबियाकडून सालेह अलसेहरीने 48 व्या मिनिटाला आणि सालेम अल्दवसारीने 53 व्या मिनिटाला गोल केले.
यानंतर दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. यानंतर 2-1 अशी आघाडी घेऊन सौदी अरेबिया संघाने हा सामना जिंकला.

 

Web Title :- FIFA World Cup 2022 | fifa world cup 2022 this is real football portugal veteran luis figos big statement on argentinas shock defeat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Assembly Elections 2022-2023 | सन 2022-23 मध्ये तब्बल 11 राज्यांमध्ये निवडणुका, जाणून घ्या इलेक्शन जिंकण्यासाठीचे मोदींचे मिशन

Pune News | विकासाच्या अनुषंगाने वक्फ मालमत्तांच्या सुयोग्य वापराविषयी मुस्लिम समुदाय करणार विचारमंथन

Sania Mirza-Varun Dhawan | वरूण धवनने सांगितला सानिया मिर्झाशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा

Must Read
Related News