Coronavirus Impact : गरीबांना Parle G चा आधार, कंपनी वाटणार तब्बल 3 कोटी बिस्कीटचे पुडे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे अनेकजण एकमेकांच्या मदतीला धावले आहेत. त्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्यांपासून ते समाजसेवकांचा समावेश आहे. आता गरिबांच्या मदतीसाठी पारले जी कंपनीने पुढाकार घेतला आहे. लॉकडाउनच्या याकाळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असणार्‍या मजुरांचे होत आहेत. सकाळी कमवायचे आणी रात्री खायचे अशी उपजिविका करणार्‍यांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी पारले जी कंपनी पुढच्या तीन आठवड्यात तब्बल 3 कोटी बिस्किट पॉकेट्सचे वाटप करणार आहे.

पारले जी कंपनीकडून दर आठवड्यात 1 कोटी अशा प्रकारे तीन कोटी पॅकेट्स देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सरकारच्या मदतीने गरजू लोकांना याचेवाटप करण्यात येणार आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशातही भारतीय समुदाने मदतीसाठी हात पुढे केला आहे. महाभयंकर कोरोनाने हाहाकार माजला आहे. या विषाणूमुळे लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. लोक घरात असली तरी वैद्यकिय कर्मचार्‍यांना मात्र दिवस-रात्र रुग्णांसाठी झटावे लागत आहे. डॉक्टर, नर्स सध्या तहान भुक विसरून काम करत आहेत. अशाच कर्मचार्‍यांना मदत म्हणून शीख समुदयाने तब्बल 30 हजार वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी लंगार तयार केले.